एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Date:

मुंबई दि. 26 : एएनएम (ऑक्सिलारी  नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षणसहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, यापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारित करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारित असेल.कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिकाद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने किती रुग्णांमागे परिचारिका असाव्यात याचा अभ्यास मंडळाने करणे गरजेचे आहे. इतर राज्यात नेमकी याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या.

श्री. देशमुख म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की या क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असते. कोविडनंतर आपल्या सर्वांना वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व समजून आले आहे. आज शाळांमध्येसुद्धा परिचारिका असणे आवश्यक आहे. कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुद्धा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे.आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीची संधी कशी उपलब्ध होऊ शकेल, कोणता अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्याची आवश्यकता असल्याने याबाबतचा अभ्यास करुन अभ्यासक्रमांचे नियोजन करावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...