Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला ई-लर्निंग संच भेट

Date:

जेजुरी ( प्रतिनिधी ) – कोथळे मधील जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला श्री.मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या वतीने ई-लर्निंग संच भेट देण्यात आला , श्री.मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे , निलेश जगताप , नितीन जगताप यांच्या हस्ते प्रदान समारंभ संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकआबा जगताप होते.

श्री.मार्तंड देव संस्थानच्या वतीने परिसरातील विविध शाळांना ई-लर्निंग संच भेट देण्यात आलेले आहेत तसेच विविध समजाउपोगी कामे सुद्धा करण्यात येत आहे , ई-लर्निंगद्वारे विद्यार्थांना प्रभावी शिक्षण देता येत असल्याने ई-लर्निंग संच भेट देण्यात आला असल्याचे सुधीर गोडसे यांनी सांगितले , तर निलेश जगताप यांनी बोलताना  सध्याचे युग संगणकाचे असून ग्रामीण भागातील मुले सुद्धा जगाच्या स्पर्धेत टिकावीत म्हणून देव संस्थानच्या माध्यमातून ई-लर्निंग देण्यात आलाय त्याचा उपयोग मुलांनी करून घ्यावा असे आवाहन केले. कोथळे पंचक्रोशीत गुणवत्ता देणारी शाळा म्हणून जगतापवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा नावाजली जातीये , मात्र शाळेचे कुंपण , पत्रा अशा समस्या आहेत  तरी विविध संस्थांनी यासाठी सहकार्य लाभावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी केले. शासनाच्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकातील धडे टीव्ही, पडद्यावर बघताना मुलांची गोडी वाढणार आहे, शहरातील विद्यार्थाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानाही उंच झेप घेता यावी म्हणून विविध शाळा ई-लर्निंगच्या माध्यमातून “डिजीटल शाळा” करण्यात येत आहेत , त्यामुळे “ई-लर्निंग” हाती आले हो, अवघड सोपे झाले ओ” अशी भावना मुलांची होत असल्याने शाळेला ई-लर्निंग संच मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रानमळा शाळेचे मुख्याध्यापक सचिन कदम , दत्तात्रय भोईटे , दिलीप जगताप ,रमाकांत जगताप , जितेंद्र जगताप , सूर्यकांत जगताप, गिरीष झगडे ,असिफ मुजावर ,आकाश लेंडे , वाल्मिक जगताप ,अनिल कड ,अनिल जगताप ,रामदास जगताप ,विकास मेमाणे ,रावसिंग जगताप ,रोहिदास भोईटे , संतोष जगताप ,भीमराव जगताप आदी उपस्थित होते , प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक उत्तम पवार यांनी केले  तर सुधीर जगताप यांनी आभार मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...