‘भाजपचे कात्रण प्रदर्शन हा प्रसिद्धीचा स्टंट’ : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ते अशोक राठी यांची टीका
पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या पुणे महानगरपालिकेतील कारभारासंबंधी केवळ नकारात्मक बातम्यांची कात्रणे शोधून मांडलेले प्रदर्शन हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट होता,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर प्रवक्ते आणि उपाध्यक्ष अशोक राठी यांनी केली आहे. भाजपाला १० वर्षातील वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या बातम्या कात्रणे करताना दिसल्या नाहीत काय ? असा प्रश्नही अशोक राठी यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.