Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हडपसरमध्ये दोनशे हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्र आणि ओळख पत्रांचे वाटप

Date:

 पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ च्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हजारी यंत्रणा प्रमुख (हजार मतदारांच्या संपर्कातील प्रमुख कार्यकर्ता) यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी झालेल्या या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला .
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये साने गुरुजी प्रशाला येथे झालेल्या कार्यशाळेत दोनशे हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.
 पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक राठी, ऍड. म. वि. अकोलकर, शंकर शिंदे यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हडपसर विधासभा मतदारसंघाचे अध्यक्ष मंगेश तुपे, प्रदेश उपाध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, विनायक चाचर, नगरसेवक चेतन तुपे, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, विजया कापरे, अनिस सुंडके, निलेश मगर, रईस सुंडके, कलेश्वर घुले, फारुकभाई इमानदार, शंतनू जगदाळे, योगेश ससाणे, सागर भोसले, प्रशांत पवार यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे, ओळख पत्रे देण्यात आली यावेळी हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप मगर, विक्रम जाधव यांनी केले .
 यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला. ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा. दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल’ चे कार्य अचूक करावे. विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...