कॅन्टोन्मेंटमध्ये एकशे पंचवीस हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्र आणि ओळख पत्रांचे वाटप

Date:

पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ च्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हजारी यंत्रणा प्रमुख (हजार मतदारांच्या संपर्कातील प्रमुख कार्यकर्ता) यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . गुरुवारी  झालेल्या या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला .
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये माही बंगला, (कासमभाई शेख यांचे निवासस्थान), प्लॉट नं ३५, गुरुनानकनगर, येथे झालेल्या कार्यशाळेत हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली .
 पुणे शहर हजारी प्रमुख व्यवस्थेच्या समन्वयक शिल्पा भोसले ,शंकर शिंदे  यांनी हजारी प्रमुखांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा , पुणे शहर उपाध्यक्ष कसमभाई शेख , कॅन्टोन्मेंट विधासभा मतदारसंघ महिला अध्यक्ष मीना पवार , माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ , आतिक मोमीन , लुकमान खान ,शैलेश म्हेत्रे , युसूफ शेख स्वीकृत सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय यांच्या हस्ते हजारी प्रमुखांना नियुक्ती पत्रे, ओळख पत्रे देण्यात आली यावेळी  हजारी प्रमुख व्यवस्थेतील कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी खासदार आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांचा संदेश हजारी प्रमुखांना वाचून दाखविण्यात आला. ‘हजारी प्रमुखांनी प्रभागात सुसंवाद ठेवावा . दैनंदिन संवादातून आत्मविश्वास ,नम्रतेने आणि संयमपूर्वक ‘बूथ लेव्हल ‘ चे कार्य अचूक करावे . विजय हेच अंतिम लक्ष्य असून ते निश्चित गाठावे ‘ असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...