पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी बाळा चव्हाण यांची नियुक्ती
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी बाळा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बडदे यांनी त्यांच्या काही खाजगी अडचणींमुळे पदाचा राजीनामा दिल्यामुळे बाळा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचे खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बाळा चव्हाण हे माजी महापौर भाऊसाहेब चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. सध्या ते पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष ,सरचिटणीस म्हणून काम केले आहे. पक्ष स्थापनेपासून ते पक्षाचे क्रियाशील सदस्य आहेत.