पालिकेतील उत्तम कामगिरी पुणेकरांपुढे मांडा :शरद पवार यांचे आवाहन

Date:

 
पुणे :
‘राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांनी ५ वर्षे उत्तम कामगिरी केली असून पुणेकर नागरिकांसमोर ही  कामगिरी मांडावी ,आपण सगळेच उमेदवार आहोत असे मानून सर्वानी निवडणुकीचे काम करावे ‘ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘सक्षम’ – उमेदवार प्रशिक्षण’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातंर्गत इच्छुक  उमेदवारांसाठी दिनांक 4 व 5 डिसेंबर 2016 रोजी प्रशिक्षण शिबीराचे आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उदघाटन केले.
खासदार वंदना वंदना चव्हाण ,महापौर प्रशांत जगताप ,प्रवक्ते अंकुश काकडे ,माजी आमदार कमल ढोले -पाटील,रवींद्र माळवदकर ,प्रवक्ते म वि अकोलकर आदी मान्यवर उपस्थित होते . अशोक राठी यांनी सूत्रसंचालन केले . रुपाली चाकणकर यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला  . एड . वंदना चव्हाण यांनी  शिबिराचा हेतू स्पष्ट केला
या शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  उमेदवारांना मार्गदर्शन केले. . हे शिबिर सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत, सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी वाढत्या शहरीकरणाकडे लक्ष वेधले . वाहतूक सुविधेसह नागरी जीवन सुसह्य करण्यामागची संकल्पना मांडली . स्वस्त घरे ,ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न,झोपड्पट्टीधारकांचे प्रश्न याकडे लक्ष वेधून अशा समस्यांवर काम करणाऱ्या संस्थाही तयार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली विकासाच्या दृष्टीने राजकारण मध्ये न आणता काम केले पाहिजे. पुण्याची ओळख गुंतवणूक आणि रोजगारासाठी होत असताना त्याला अनुरूप धोरणे राज्य सरकारने आखायला हवीत ‘ असेही शरद पवार यांनी  सांगितले
‘५० टक्के आरक्षण दिल्यानंतर राजकारणात महिलांचा  आहे आणि त्या चांगले काम करीत आहेत असे ही  शरद पवार यांनी  सांगितले .
‘ निवडणूक कशी लढवावी ,हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ,कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक लढा . राज्यकर्ता उत्तम असला की कारभाराचा गाडा उत्तम चालतो . नागरी जीवन सुसह्य करण्यासाठी आपण सर्वानी कार्यरत राहावे ‘ असे ते म्हणाले
नोटबंदीच्या व्यवस्थापनावर त्यांनी टीका केली .सर्वसामान्यांना यातना होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली .
स्मार्ट सिटी हे आभासी चित्र :अजित पवार यांचा  हल्ला 
. या शिबिरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित  पवार म्हणाले की काळा पैसा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुमत नाही. पण या निर्णयामुळे गोरगरिबांचे जे हाल होत आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजे. या पार्श्वभूमीवर ठोस व निश्चित उपाय योजना न करता लोकांशी भावनिक खेळ चालला आहे. अशावेळी सर्व कार्यकर्त्यांनी लोकांच्या सहाय्यासाठी उभे राहिले पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे नेमके काय हे अजून केंद्र व राज्य सरकार सांगू शकले नाही. स्मार्ट सिटीतून केवळ एकाच भागाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरूआहे. केवळ आभासी चित्र तयार केले जात असून कृतीशून्य आहे हे पुणेकरांना दाखवून द्यायला हवे. मेट्रो, छत्रपती शिवाजी स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा नुसत्याच घोषणा झाल्या आहेत.
 पाणी व पुण्याच्या कचरा प्रश्नी सरकार हेतूपुरस्सर विलंब करत आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डात, प्रभागात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास उभे राहिले पाहिजे. विकासाच्या नावाखाली सरकारची ही फसवी धोरणे आपण पुणेकरांच्या लक्षात आणून द्यायला हवीत.बीआरटी, पुण्यातील रस्ते, उड्डाणपूल यातील त्रुटी दूर करून पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे काम आपण हाती घेतले आहे व वेगाने सुरू आहे. पुणेकरांसाठी ‘जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणणे’ हीच राष्ट्रवादीची वृत्ती आहे.पुण्याला जुने वैभव मिळवून देताना काळानुरूप कॉस्मोपॉलिटन होऊ पाहणार्‍या पुण्याची सर्वोतपरी काळजी घेणं ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची व पक्षाची प्रमुख जबाबदारी आहे.औट घटकेचे राजकारण  राष्ट्रवादीने कधीही केले नाही पुढील २० ते २५ वर्षांचा अंदाज घेऊन काम केले आहे. पर्यावरणाला राष्ट्रवादीने प्राधान्य दिले आहे.
पुण्याला शुद्ध हवेचे वैभव परत मिळाले पाहिजे :अरुण फिरोदिया 
उद्योजक अरुण फिरोदिया यांनी ‘नागरीकरणावर ‘ मार्गदर्शन केले . पर्यावरण रक्षण कायद्यांतर्गत महापौर ,आयुक्त खूप काम करू शकतात ,पुण्याला शुद्ध हवेचे वैभव परत मिळाले पाहिजे . विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे ,सायकल ट्रॅक ची अंमलबजावणी झाली पाहिजे ,प्रत्यकाने आठवड्याला काही तास वॉर्डात दिले पाहिजेत ,लोकशाहीवर विश्वास वाढवायचा असेल तर लोकसहभाग वाढवला पाहिजे अन्यथा हुकूमशाहीकडे वाटचाल होईल ‘,असे फिरोदिया यांनी सांगितले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...