काकडेंच्या रॅलीत बापटांचे हेर ….

Date:

पुणे- आज पुण्यात नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदी च्या निर्णयाच्या समर्थनार्थ खासदार संजय काकडे यांनी काढलेल्या रॅलीत (शक्ती प्रदर्शनात ) पालक मंत्री गिरीश बापटांचे हेर उपस्थित होते. एकूणच काकडेंच्या मागे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस असल्याची एकीकडे चर्चा होती तर दुसरीकडे मुळ पुण्यातील भाजपचे  असलेल्यांची पोटदुखी देखील असल्याचे दिसत होते . या अनुषंगाने  ‘निष्कामी निष्ठावंत आणि धनशक्ती चा प्रभाव ‘अशी पक्षांतर्गत लढाई असल्याचे स्पष्ट होत होते .   मनीष कांबळे , रमेश काळे असे बहुजन समाजाचे नगरसेवक आणि खासदार अनिल शिरोळे स्वतः या रॅलीत सहभागी होते . मात्र शिरोळे स्वतः सहभागी झाले तरी त्यांचे कार्यकर्ते नसल्याने , ते देखील हातचे राखून इथे आल्याचे बोलले जात होते . रॅलीत आलेली माणसे कशी कोठून आली ? याचा शोध घेताना काही कॅमेरामन चा देखील आधार घेवून मुलाखतीदेखील  घेण्यात आल्या .

या सर्व परिस्थितीत ही रॅली म्हणजे भाजापातील नेतृत्वाच्या राजकारणाचा भाग आहे कि काय ? असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला होता . या पूर्वी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात काकडेंना पुढे न येवू  देणे , धक्काबुक्की करीत बाजूला सारणे  असे प्रकार ही झाले . काकडेंनी त्यावर मात करायला म्हणून ज्या ‘मिडिया पर्सन ‘ ची साथ घेतली त्यांनीच बापटांसाठी जणू इथे हेरगिरी चालविली असे दिसत  होते . एकीकडे बहुजनाविरुद्ध , आणि दुसरीकडे नीतिमत्ते विरुद्ध ची लढाई असे चित्र रंगविले जात असले तरी भाजपच्या पुण्यातील नेतृत्वा बद्दल चीच हि लढाई … ‘असल्याचे स्पष्ट होत होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडच्या रंगमंचावर नव्या स्वप्नांची ‘नांदी’!

चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून 'नाट्यतीर्थ फाउंडेशन'चे लोकार्पण पुणे: कोथरूडमधील घराघरांत...

पूरमुक्त ‘शिवाजीनगर’साठी ३० कोटींचा निधी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुराचा धोका टाळण्यासाठी औंधमध्ये नाला, ओढ्यालगत सीमा भिंत पुणे :...

कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये महिलेसोबत आढळलेला पोलिस हवालदार निलंबित

पुणे-कोम्बिंग ऑपरेशन ड्युटीवर असल्याचे खोटे सांगून पबमध्ये एका महिलेसोबत...