पुणे :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर १००० ढोल वाजवून महाराजांची पुण्यतिथी भाजप सरकारने साजरी केली. या कृतीचा निषेध म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने निषेध केला. ढोलांवर तावडे यांची प्रतिमा असलेले ढोल बडवून तसेच तावडे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला.
आपल्या वडिलांच्या मृत्यूदिनी कोणी असा आनंद व्यक्त करतात का? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ११ एप्रिल रोजी रायगडावर तिथीप्रमाणे पुण्यतिथी होती, महापुरुषांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणे ही विकृती आहे कारण कोणीही आपल्या आदर्शांच्या मृत्यू दिनी असे ढोल बडवून आनंद व्यक्त करत नाहीत.
तावडेंची ही कृती महाराष्ट्राचा आणि देशाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने अशा विकृतीचा जाहीर निषेध केला, असे ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक’ चे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी सांगितले.
यावेळी ‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक’ चे शहराध्यक्ष राकेश कामठे, पुणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, अच्युत लांडगे, सनी किरवे, संतोष डोख, विनोद काळोखे, निलेश वरे, विकी मोरे, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, फहिम शेख, सागर भदारके, अमोघ ढमाले, बाबा पाटील, रोहित जसवंते, सचिन जोरी, रुपेश संत, सौरभ गुंजाळ, गजानन लोंढे, विक्रम जाधव, विशाल मोरे, शेराली शेख यांसह पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.