पुणे- कोथरूड परिसरात आपले वेगळेपण आणि महत्व राखून असलेल्या पतितपावन संघटनेणे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार दीपक मानकर , अश्विनी जाधव , रामचंद्र कदम,वैशाली मराठे या उमेदवारांना पाठींबा जाहीर केला आहे .
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर येथून दीपक मानकर आणि त्यांचे सहकारी उमेदवार निवडणूक लढवीत आहेत . आज त्यांना भेटून पतितपावन संघटनेच्या कोथरूड विभागाचे प्रमुख राजाभाऊ मोहोळ ,अध्यक्ष सुनील मराठे,संपर्क प्रमुख गणेश सातपुते,कर्वेनगर विभागप्रमुख अण्णासाहेब बांगर आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले .