Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या-राष्ट्रवादी

Date:

पुणे-पारदर्शक मतदान पद्धती हवी असेल तर इथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेटपेपरवरच घ्याव्यात अशी स्पष्ट मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटक राज्याचा आज निकाल जाहीर झाल्यावर मीडियाशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

ईव्हीएमवर आमचा  विश्वास नाही. ईव्हीएम मॅनेज केले जावू शकते हे या देशातील अनेक मोठे मान्यवर लोकं बोलत आहेत.त्यामुळे ईव्हीएमचा निवडणूक आयोगाने हा आग्रह सोडून दयावा आणि पुन्हा एकदा बॅलेटपेपरचा वापर करावा. पेपर मोजायला वेळ लागेल. लोकांच्या मनातील शंका घालवण्यासाठी निवडणूक आयोगाने इथून पुढच्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी  त्यांनी केली.  

कर्नाटकमधील येडुरप्पांची प्रतिमा बघितली, त्यांच्यावर झालेले वेगवेगळया भ्रष्टाचाराचे झालेले आरोप बघितले किंवा भाजपचे त्या राज्यातील अस्तित्व पाहिलं तर मर्यादित होतं त्यामुळे आता त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की,जनता दलामुळे सेक्युलर मतं जी आहेत त्याचा फायदा भाजपला झाला का? किंवा भाजप ज्याठिकाणी कधीही आलं नाही त्या ठिकाणी भाजप येण्याची काय कारणं आहेत. जर जनाधार नसेल आणि तरी तिथे भाजपला बुथवर जास्त मतं मिळाली तर राज ठाकरे यांच्या मतानुसार ईव्हीएमबद्दल शंका घेण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया मीडियाला दिली.

आज जी आकडेवारी आली आहे ती वस्तुस्थिती आहे. निकाल जाहीर झाले आहेत. जेव्हा जेव्हा पराभव होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं दोष देतात. आणि ज्या ज्यावेळी विजय होतो त्यावेळी ईव्हीएमला लोकं विसरतात. त्यामुळे लोकांच्या मनात काहीका असेना ईव्हीएमबद्दल शंका आहे ही वस्तूस्थिती आहे. म्हणून  ईव्हीएमचा जो उद्देश होता फेक आणि अत्यंत पारदर्शकपणे निवडणूका व्हाव्यात त्याबद्दलच लोकांची शंका आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचा विचार करावा. कर्नाटकची वस्तुस्थिती बघितली तर मलाही आश्चर्य वाटत की काँग्रेस इतकी कमी होण्याचं कारण नव्हतं असेही जयंत पाटील म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...