Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तुमच्यासह राज्यातील सर्व जमिनींचा पहिला मालक मी ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी सहजगत्या सांगितले एक सत्य …..

Date:

पुणे – तुमच्या  जमिनीसह राज्यातील सर्व जमिनींचा पहिला मालक महसूलमंत्री म्हणून मी आहे , मी कधीही तुमची जमीन सरकारजमा करू शकतो, तुम्ही बस वर्षानुवर्षे कोर्टात भांडत असे सत्य .. अगदी सहजगत्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले . 

राज्य सरकारकडून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहनपर देण्यात येणारा “जिजामाता’ पुरस्कार एका वर्षातच बंद पडला. हा पुरस्कार का बंद केला, त्याची माहिती घेऊन पुन्हा तो सुरू करण्याचे आश्‍वासन यावेळी मंत्री पाटील यांनी  दिले.नॅशनल स्पोर्टस ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या “तुळजाभवानी क्रीडा पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मनपा क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात आदी उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांना “जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला; तर नेमबाजपटू हीना सिद्धू, ऐश्‍वर्या सातव, क्रीडा पत्रकार मेधा कुचिक, अपूर्वा कुंभकोणी, महाराष्ट्रीय मंडळाच्या प्राचार्या नेहा दामले, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणे, ऋचा पुजारी, नभा भांबुर्डेकर, महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे, अंजली रहाणे-पाटील, श्रेया नानकर यांनाही गौरविण्यात आले. गुणवंत जरांडे यांना जाहीर झालेला मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.

सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘प्रत्येक क्षेत्रात महिलांची भरीव कामगिरी होत असते. जिजामाता पुरस्काराबाबत माहिती घेऊन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करू; तसेच ट्रस्टच्या वतीने जे ऑलिंपिक संग्रहालय उभारणी, खेळाडूंसाठी मदत आणि समुपदेशन केंद्र उभारण्यामध्ये राज्य सरकार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू.”

महापौर टिळक म्हणाल्या, ‘सध्याच्या परिस्थितीत महापौर चषक स्पर्धा घेताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला जातो. यापुढे महापौर चषक स्पर्धा ही शहरासोबत जिल्हा पातळीवरदेखील घेण्यात येईल; तसेच महापालिका स्तरावर खेळाडूंसाठी आवश्‍यक ते सहकार्यही केले जाईल.”

दीप्ती चवधरी यांनी प्रास्ताविक केले. मनीषा कोंढाळकर-घाटे, स्मिता शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुबन्स कौर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...