पुणे–देशातील डेव्हलपर्सचीसर्वोच्च संस्था क्रेडाई – नॅशनलची अहमदाबाद येथे २०१७–२०१९ साठी प्रेसिडेन्टशीपची निवडणूक झाली. त्यातपुण्याचे श्री. सतीश मगर प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून सर्वानुमते निवडून आले. तरअहमदाबादचे श्री. जक्षय शहा क्रेडाई – नॅशनलचे प्रेसिडेंटझाले. इतर नेमणुकांमध्ये क्रेडाई – महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. शांतीलाल कटारिया हे महत्वाच्या अफॉरडेबलहौसिंग कमिटीचे चेअरमन झाले. तर क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत परांजपे यांची चेअरमन–फायनान्स कमिटी , श्री. सुहास मर्चंट यांची चेअरमन–रेरा कमिटी, श्री. रणजित नाईकनवरे यांची चेअरमन–बांधकाम कमिटी, नॅशनल युथ विंगची जबाबदारी पुण्याचेच श्री. आदित्य जावडेकर यांना तर महिला विंगची जबाबदारी सौ. दर्शना परमार जैन यांना सोपिवण्यात आली आहे. श्री. जे. पी. श्रॉफ यांची स्किलिंग कमिटीचे कनवेनर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व सभासद क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यकारणी समितीचे सभासद आहेत. देशातील १६९ शहरातून सुमारे १२०००डेव्हलपर्ससभासदांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संघटनेच्या कार्यकारणी समिती मध्ये पुण्याचे प्राबल्य दिसून येते. पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून राष्ट्रीय स्तरावर ते महत्त्वाची भूमिका ह्या पुढे करीत असताना दिसतील.