पुणे-अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयामध्ये पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे हस्ते पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. या प्रसंगी सांस्कृतिक जीवन समृद्ध होण्यासाठी ग्रंथालये अत्यंत महत्वाची आहेत. नॉलेज ईकॉनॉमीच्या काळात ग्रंथालय व ग्रंथपाल यांची भूमिका खूप मोलाची आहे. आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महापूर आलेला आहे. यामध्ये माहिती प्रसार माध्यमांचा खूप मोठा प्रभाव आहे. या तांत्रिक काळात घरोघरी – दारोदारी ई-स्वरूपातील वाचन साहित्य पोचले आहे. त्यामुळे ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांची भूमिका खूप महत्वाची आहे. वाचकाला योग्य साहित्याबद्दल जागृत करणे, निवडक माहिती कशाप्रकारे मिळवता येईल, ई-साहित्याची खरेदी कशी करावी यामध्ये ग्रंथपालाची भूमिका खूप महत्वाची आहे. आज ग्रंथालय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर्स, लायब्ररी नेटवर्क्स,डेटाबेस, ई-लायब्ररी, डिजिटल लायब्ररी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या विश्वात कामा करणारा ग्रंथपाल हा सामाजिक महत्वाचा घटक आहे. ई-रिसोर्सेस व पारंपारिक साधने या दोन्हीचा समन्वय राखण्यासाठी ग्रंथपाल नेहमीच प्रयत्नशील रहावे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी डॉ. रंगनाथान यांच्या कार्याचा आढावा घेवून ग्रंथालय चळवळीचे महत्व सांगितले.राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.गणेश कोंढाळकर,प्रा. सागर गावंडे, प्रा.दत्तात्रय कांबळे, प्रा. रमा गायकवाड, प्रा.स्नेहा साळवेकर प्रा.नवनाथ सरोदे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिकक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी केले. हा सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे नियम पळून पार पडला.