Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘​​ हे राम, नथुराम ‘ नाटकाविरुद्ध संघर्ष चालूच राहील -विकास लवांडे

Date:

पुणे :
‘ गांधी विचार हाच मानवतावादी, शाश्वत विचार असून ‘ हे राम, नथुराम ‘ नाटक इतिहास विकृत स्वरुपात सादर करीत असल्याने या नाटकाविरुद्धचा संघर्ष चालूच राहील ‘ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.
२८ जानेवारी रोजी  पुण्यातील ‘ नथुराम ‘ प्रयोगाला जोरदार विरोध केल्याने विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केली होती. व्यक्तिगत बाँड लिहून देणार नाही, सत्याग्रह करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र , राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी हा संघर्ष पोलिस कोठडीतून लढण्यापेक्षा बाहेर सुरू ठेवावा, असा सल्ला दिल्याने श्री. लवांडे यांनी व्यक्तिगत बाँड दिला.
‘ राष्ट्रपुरुष असलेल्या महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे विकृत रुपांतरण सहन करणार नाही. आणि ‘ नथुराम ‘ नाटकाविरुध्द चळवळ चालूच ठेवणार .’हे राम नथुराम नाटक ‘ त्वरित बंद झालेच पाहिजे.राष्ट्रपुरुषांची बदनामी अवमान करणाऱ्या नाटक निर्माते लेखक कलावंत इत्यादी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करुन आलेल्या नाटकातून राष्ट्रपुरुषावर विकृत शेरेबाजी सहन करणार नाही.सत्याचा आवाज मोठा केला पाहिजे ‘
असे श्री. लवांडे यांनी पत्रकात म्हटले आहे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...