निवडणुकीच्या धामधूमीतही पिण्याच्या पाण्यासाठी ,शिवसेनेच्या नगरसेवक भानगिरे यांच्यावर आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ
पुणे:- एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम आहे आणि अशा धामधुमीत देखील पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेना नगरसेवकाला रस्त्यावर येवून आंदोलनाचा इशारा द्यावा लागला .पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये काळेपडळ,हांडेवाडी रोड,चिंतामणीनगर,दुगड चाळ,बडदे मळा परिसरात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे,शिवसेनेच्या वतीनं नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पदरखर्चाने रोज 15 पाण्याचे टँकर नागरिकांकरिता मोफत सुरू केले आणि नियमित पाणीपूरवठा व्हावा याकरिता वारंवार लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला,पण तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने दि.3/4/2019 बुधवार रोजी सायंकाळी 4.30 ला शहीद सचिन फराटे चौक काळेपडल येथे सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा अखेर नगरसेवक भानगिरे यांनी केली
यानंतर लष्कर पाणी पुरवठा विभाग,पुणे मनपा विभाग सतर्क झाला,लष्कर पाणी पुरवठा विभाग अभियंता श्री पावरा यांनी पाणी पुरवठा नियमित व पुरेसा करण्याचे आश्वासन दिले,तर वानवडी पोलीस प्रशासनाने आचारसंहिता असल्याने आंदोलनास परवानगी देता येणार नाही अशी माहिती दिल्याने आंदोलन स्थगित केले असल्याचे नगरसेवक भानगिरे यांनी सांगितले.प्रभाग 26 मध्ये पाणी टंचाईची झळ नागरिकांना पोहोचू नये याकरिता स्वखर्चाने रोज 15 टँकर पाण्याचे वाटप सुरू असून लष्कर पाणी पुरवठा विभागाने उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.