17 वर्षाखालील टेनिस राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या कशित नागराळेचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय  

Date:


नाशिक, 9 एप्रिल 2022: नाशिक जिल्हा लॉन टेनिस संघटना(एनडीटीए) यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्याच फेरीत नागपूरच्या कशित नागराळे याने अमरावतीच्या चौथ्या मानांकित कुशल बात्राचा 4-0, 4-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. 
एनआयडब्लूइसी टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात साताराच्या पाचव्या मानांकित ओंकार शिंदे व नागपूरच्या तेजल पाल यांनी अनुक्रमे सोलापूरच्या प्रसन्न पांडेकर व अकोल्याच्या पार्थ ठाकरेचा 4-0, 4-1 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. मुलींच्या गटात पाचव्या मानांकित पुण्याच्या रिया भोसले हिने आठव्या मानांकित साताऱ्याच्या वेदिका माळीचा 4-0, 4-1 असा तर, सहाव्या मानांकित पुण्याच्या रमा शहापूरकरने नाशिकच्या भावना सुंदरारामाचा टायब्रेकमध्ये 4-1, 5-3(5) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. 
स्पर्धेचे उदघाटन नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देशपांडे, एनआयडब्लूइसी क्लबच्या टेनिस विभागाचे अध्यक्ष श्रीकांत कुमावत, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील, एमएसएलटीएच्या सुपरवायझर तेजल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:17 वर्षांखालील मुले:कशित नागराळे(नागपूर)वि.वि.कुशल बात्रा(अमरावती)[4] 4-0, 4-0;ओंकार शिंदे(सातारा)[5] वि.वि.प्रसन्न पांडेकर(सोलापूर)4-0, 4-1; लक्ष्य गुजराथी(येवला)[6] वि.वि.कर्तव्य कारंडे(नांदेड)[7] 4-0, 4-0;तेजल पाल(नागपूर)वि.वि.पार्थ ठाकरे(अकोला)4-0, 4-1; सार्थक पोद्दार(परभणी)[8] वि.वि.अनुश घनबहादूर(नाशिक)4-2, 4-2;

17वर्षांखालील मुली:रमा शहापूरकर(पुणे)[6] वि.वि.भावना सुंदरारामा(नाशिक)4-1, 5-3(5);रिया भोसले(पुणे)[5]वि.वि.वेदिका माळी(सातारा)[8] 4-0, 4-1;

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...