Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नायक नही ‘खलनायक’ हूँ मै

Date:

आपल्या कटकारस्थानांनी नायकाला बेजार करणारा खलनायक आपण नेहमीच चित्रपटांमधून बघतो. हिंदी चित्रपटाला खलनायकांची एक मोठी समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु मराठी चित्रपटांत तुलनेने कमी खलनायक पडद्यावर साकारले गेलेत. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘नगरसेवक’ चित्रपटात मराठीतल्या सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक एक नायक या मराठी चित्रपटात सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून नायकाला बेजार करताना दिसतील. येत्या ३१ मार्चला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

‘प्रत्येक नेता हा अभिनेता असतो’ असं म्हणणाऱ्या दत्ता शिवलकर या खलनायकाची भूमिका गणेश यादव यांनी साकारली असून सयाजी शिंदे हे भाऊ शेट्टी या स्थानिक पक्षप्रमुखाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सुनील तावडे यांनी या चित्रपटात खास बेरिंग धरत आमदार काळे उभा केला आहे, तर संजय खापरे यांनी निशिकांत कोळी या बेरकी कार्यकर्त्याची भूमिका रंगवली आहे.

 

नायक खलनायक ही जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. दिपक कदम दिग्दर्शित नगरसेवक मधील खलनायकांच्या या वेगवेगळ्या शेड्स प्रेक्षकांना निश्चितच भावतील. या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर त्रियोगी मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम,वर्षा दादंळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत.चित्रपटाची कथा बिपीन धायगुडे व अभिजीत कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिलेत. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर याचं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...