मुस्लिम बँकेच्या बैठकीत उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली
पुणे :उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आकस्मित निधनाबद्दल मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला .
मुस्लिम को -ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार ,उपाध्यक्ष मुमताज सय्यद, सचिव हारुण सय्यद , प्रशासकीय अधिकारी अनीस खान, इम्तियाज मुल्ला, अझीम शेख ,सर्व संचालक तसेच कर्मचारी वर्ग बैठकीला उपस्थित होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष पी ए इनामदार होते . ‘मुस्लिम आणि मागास समाजाच्या आर्थिक ,शैक्षणिक उन्नती हा नवनाथ कांबळे यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता . त्यांच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे . पुणे शहराचे नेतृत्व आकाराला येत असताना मावळणे ही दुर्दैवी घटना आहे ‘,असे यावेळी मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावात म्हटले आहे .