ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला.
कोणकोणत्या भागात वीज गायब?
- दादर
- लालबाग
- परळ
- प्रभादेवी
- वडाळा
- ठाणे
- नवी मुंबई
- पनवेल
- बोरिवली
- मालाड
- कांदिवली
- पेण
- पनवेल
- उरण
- कर्जत
- खालापूर
या बाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणार्या विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे शहरातील कार्यालये, लोकल रेल्वे ठप्प झाली असून रुग्णालयांनाही याचा फटका बसला आहे. ग्रिड बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असल्याची पुष्टी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट [बेस्ट] च्या प्रवक्त्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 400 केव्हीची लाइन खराब झाली आहे. यामुले एमआयडीसी, पालघर, डहाणू भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. राज्य सरकारने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपडेट्स…
- वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील कॉलेजमध्ये सोमवारी होणाऱ्या अंतिम वर्षांच्या ऑनलाइन परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
- मुंबई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणारी सुनावणी देखील थांबवण्यात आली.
- मुंबईच्या रुग्णालयांतील वीजपुरवठा गेल्यामुळे व्यवस्था ढेपाळली. शहरातील 6 कोविड रुग्णालयांत जनरेटरद्वारे काम सुरू करण्यात आले.
- राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.