सर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विषयांसंदर्भात बैठक
मुंबई, दि.29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे‘ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, क्रिडाई व नारडेको या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चितच ठोस उपाय शोधले जातील. यात त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि केंद्र शासनाकडून मिळणारे सहकार्य महत्त्वाचे आहे.
बैठकीत गृहबांधणी प्रकल्प तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...