मुंबई / प्रतिनिधी
दलित,शोषित,वंचित समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणा-या व्यक्तीस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देण्यात येणार महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2017-18 या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे वितरण येत्या मंगळवार दिनांक 3 जूलै रोजी सकाळी 11 वा.नागपूर येथे करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी 61 व्यक्ती व 6 संस्थांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये मुंबई मरोळ मधून बौध्दाचार्य,कोंडिवटे बुध्द लेणी बचाव कृती समितीचे संस्थापक सरचिटणीस प्रकाश कमळाकर जाधव ( मेढेकर) व एससी एसटी आयोगाचे न्यायिक सदस्य माजी न्यायाधीश सी एल थुल यांचा समावेश आहे.एससी /एसटी विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणा-या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासना मार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात.
2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तींची निवड समितीने केली आहे.मंगळवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वा.नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ,सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.दरम्यान रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे म्हणाले कि प्रकाश जाधव हे आंबेडकरी चळवळीचा सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता आहे.आंबेडकरी चळवळीत नि:स्वार्थपणे काम करीत असताना जाधव यांनी कोणालाही दुखविले नाही.रात्री अपरात्री आंबेडकरी चळवळीच्या विचाराने,कृत्याने झपाटलेला माणूस म्हणून प्रकाश जाधव यांची ओळख असून बाबासाहेबांच्या नावाने सच्चा चळवळीच्या कार्यकर्त्याचा सन्मान होत आहे ही अभिमानाचे गोष्ट आहे.प्रकाश जाधवांच्या रुपाने राज्य शासनाने योग्य माणसाची निवड केल्याबद्दल त्यांचेही आभार यावेळी गौतम सोनावणे यांनी मानले.