Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे झोनमध्ये 5517 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Date:

पुणे : वीजबिलांच्या थकबाकीदार उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम आणखी तीव्र केली आहे. गेल्या पाच दिवसांत पुणे परिमंडलातील 5517 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही थकीत रकमेचा भरणा करण्यास कोणताही प्रतिसाद न देणार्‍या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित धडक मोहीम पुणे परिमंडलात सुरु आहे. महावितरणच्या विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिमंडलातील 5517 थकबाकीदारांचा या मोहिमेत 3 कोटी 55 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलातील काही भागात दरमहा वीजबिलांची वसुली ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा कमी झालेली आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. वसुलीअभावी वीजबिलांच्या थकबाकीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने थकबाकीदार सर्वच छोट्या-मोठ्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकीत वीजबिलांच्या वसुली कामात हयगय करणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिलेल्या आहेत.

चालू व थकीत देयकांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई नाईलाजास्तव करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....