पुणे, दि. 10 : वीजबिल भरण्यासाठी दि. 11 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ग्राहकांकडून त्यांच्या वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. त्यासाठी पुणे परिमंडलातील सर्व वीज बिल भरणा केंद्ग दि. 11 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून दि. 11 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्री वाजेपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. वीजग्राहकाचे वीजबिल जेवढ्या रकमेचे असेल तेवढ्या रकमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणची पुणे परिमंडलातील वीजबिल भरणा केंद्ग दि. 11 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
केंद्ग शासनाने जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे ज्या लघुदाब वीजग्राहकांची वीज देयक भरणा मुदत अथवा प्रॉॅम्ट पेमेंटची तारीख 9 ते 14 नोव्हेंबर या दरम्यान आहे अशा ग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे म्हणून महावितरणने त्यांची वीजबिल भरण्याची तारीख 15 नोव्हेंबर, 2016 पर्यंत वाढवली आहे. तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी महावितरणचे .. संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
दि. 12 ते 14 नोव्हेंबरला वीजबील भरणा सुरु
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 12), रविवारी (ता. 13) व सोमवारी (दि. 14) सुरु राहणार आहेत. या तिनही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्ग त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.