पुणे परिमंडलातील ग्रामीण भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर

Date:

  • चक्रीवादळामुळे अंधारलेल्या 98 टक्के ग्राहकांकडे 24 तासांत वीज सुरु.

पुणे-  ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलात प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी यंत्रणा जमीनदोस्त झाली. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत 12 तासांमध्ये काल रात्रीपर्यंत तब्बल 1 लाख 27 ग्राहकांचा तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी 6350 ग्राहकांचा अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याची कामगिरी केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत अतिदुर्गम व डोंगराळ भागातील सुमारे 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु होती.

 या चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वादळ व मुसळधार पाऊस झाला. वीजयंत्रणेवर झाडे व मोठ्या फांद्या पडल्याने काही मोजक्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अवघ्या दीड तासांच्या कालावधीमध्ये तेथील वीजपुरवठा दुरुस्ती कामे व पर्यायी व्यवस्थेमधून सुरु करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी अभियंते व कर्मचाऱ्यांनी चोखपणे बजावली.

ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागातील वीजयंत्रणेला मात्र या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. पुणे परिमंडल अंतर्गत लोणावळा, खंडाळा, पानशेत, कामशेत, वेल्हा, मुळशी, जुन्नर, आंबेगाव आदी परिसरातील डोंगराळ व दुर्गम भागातील वीजयंत्रणा वादळामुळे कोलमडली. यामुळे 245 गावांमधील 1 लाख 36 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र सोमवारी (दि. 17) रात्री उशिरापर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुरुस्ती कामे करीत तब्बल 1 लाख 27 हजार आणि मंगळवारी (दि. 18) दुपारी 12 वाजेपर्यंत 6350 अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अंधारलेल्या 245 पैकी 215 गावे, वाड्या व वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सद्यस्थितीत लोणावळा, आंदरमावळ, पानशेत, माले, खानापूर व आंबेगाव परिसरातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील 30 गावे, वाड्या, वस्त्या व पाड्यांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी शहरासह ग्रामीण भागातील मोठे व कोविड रुग्णालयांसह ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रांचा वीजपुरवठा चक्रीवादळाच्या कालावधीत सुरळीत राहील याची महावितरणकडून विशेष काळजी घेण्यात आली व सुरळीत ठेवण्यात आला. चक्रीवादळाचे वेगवान वारे गेल्या 48 तासांपासून पुणे परिमंडलामध्ये घोंघावत होते. मात्र ‘हाय अलर्ट’वर असलेल्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पूर्वतयारीने व युद्धपातळीवरील सज्जतेमुळे वीजपुरवठ्यावर प्रामुख्याने संपूर्ण शहरी व बहुतांश ग्रामीण भागात फारसा परिणाम झाला नाही.

सद्यस्थितीत ग्रामीण भागातील सर्व मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र दुर्गम व डोंगराळ भागात लघुदाबाच्या वाहिन्या व रोहित्रांच्या स्ट्रक्चरवर झाडे व फांद्या पडलेल्या आहेत. त्या हटवून लघुदाब यंत्रणेची दुरुस्ती वेगाने सुरू आहे व उर्वरित 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...