वीज अपघात टाळण्यासाठी सतर्क राहा, सावध राहा!

Date:

लेखक – निशिकांत राऊतजनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती

7875762055

-जीवनाश्यक झालेली वीज दिसत नाही. मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. विजेपासून फायदा होत असला तरी तिचा वापर करताना वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधगिरी बाळगली नाही तर जीवघेणे नुकसान सुद्धा होऊ शकते. जाणते किंवा अजाणतेपणी कोणत्याही क्षणी झालेली चूक ही वीज माफ करीत नाही. त्यामुळे घर, कार्यालय, शेती, उद्योग, व्यवसाय आदींसह सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा व विद्युत उपकरणे यापासून सतर्क व सावध राहणे अतिशय आवश्यक आहे.

वीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची स्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वायरिंगची तपासणी करून घेणे घ्यावी. तसेच सर्व प्लग पाईंट, हिटर, फ्रिजसाठी अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घेत राहावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची वितळ (फ्यूज) तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

ELCB म्हणजेच (Earth leakage circuit Breaker) या उपकरणामुळे वीज अपघात टळू शकतो किंवा घरातील महागड्या उपकरणांचे नुकसान होणार नाही. घरात कुठेही ३५ मिली अ‍ॅम्पियरचे लीकेज असेल, तर ही ELCB ट्रीप होते व विजेचा पुरवठा बंद पडतो. लीकेज काढणे किंवा त्याची दुरुस्ती करेपर्यंत विजेचा प्रवाह सुरूच होत नाही. घरात हे योग्य कॅपॅसिटीचे उपकरण बसवून घेतल्यास वीज अपघाताचा धोका कमी होतो.

ओलसर जागा, पाण्याचे नळ, गॅस पाईप यापासून वायरिंग दूर ठेवण्यात यावी. वायरच्या इन्सूलेशनवर ओलसर भागाचा परिणाम होऊन करंट येण्याची शक्यता असते. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. घरातील वायरिंगची काळजी घ्यावी व कुठल्याही विद्युत उपकरणाशी खेळू नये. लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणामधील कनेक्शनची माहिती नसताना ते दुरुस्त करू नये किंवा त्यात कोणतेही बदल करू नये. उपकरण दुरुस्त करावयाचे असल्यास त्याचा प्रथम वीजपुरवठा बंद करावा व काम करावे. घरामध्ये वायरिंगची कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास प्रथम मेन-स्विच बंद करावा व मग काम करावे.

घरांतील वायरिंग खूप जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे. घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लीकेज करंटची समस्या वाढते. त्यामुळे शॉक लागण्याची तसेच इलेक्ट्रीक बिल जास्त येण्याची शक्यता वाढते. घरातील दूरचित्रवाणी, संगणक व इतर सर्व उपकरणांचा वीज प्रवाह काम संपल्यानंतर स्वीच बोर्डावरील स्वीचपासून बंद केला पाहिजे. घरामध्ये कुठेही विद्युत प्रवाह असलेली वायर उघडी राहू देऊ नये. उघडी वायर असल्यास इन्शुलेसन टेप गुंडाळावा. दरवर्षी उन्हाळा तापदायक ठरत असल्याने पुण्याच्या शहरी भागातही आता कुलरचा वापर वाढत आहे. कुलरमधे पाणी भरताना स्वीच बंद करून व प्लग पिन काढून ठेवल्यानंतरच कुलरमध्ये पाणी भरावे. त्यानंतर स्वीच चालू करावे. कुलरचे अर्थिग चांगले असल्यास लिकेज करंट येत नाही.

घरातील वायरिंग किंवा विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्यावेत. ते कायद्याने बंधनकारक आहे.वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स, केबल्स, केसिंग, पी.व्ही.सी. पाइप, स्विचेस, सर्किट ब्रेकर्स आदी साहित्य हे दर्जेदार व आय.एस.आय. मार्कचे असणे आवश्यक आहे. घरातील वीजभारानुसार योग्य क्षमतेचे फ्यूज, वायर्स, स्विचेस यांचा वापर करावा. एका उपकरणासाठी एकच प्लग सॉकेट व पीन टॉपचा वापर करा. मल्टी पीन टॉप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडू नका. तात्पुरते वायरिंग शक्यतो टाळले पाहिजे. घरात ओल्या हाताने स्वीच चालू किंवा बंद करू नका. धातूचे आवरण असलेली विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. बाथरूममधील वॉटर हीटर्स, गीझर्स चालू-बंद करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.

 

वीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तुंपासून सावध राहणे अतिशय आवश्यक आहे. विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विचबोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तुंच्या सहाय्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीजअपघातांचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

तसेच विजेच्या खाबांना किंवा स्टेवायरला जनावरे बांधू नये व त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत. शहरी व ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी किंवा नागरिक विद्युत खांबांना सायकली टेकवून ठेवतात. ते टाळावे किंवा असे प्रकार आढल्यास संबंधीतांना सावध करावे. विद्युत खाबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे. तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करून नये. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...