सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर व एकच स्लॅब

Date:

मुंबई-

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवल्याने या मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशमंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात गुरुवारी (दि. 13) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अस्थिर आकार आणि 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार असा एकूण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 38 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत.

वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाहीत किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी. सुरक्षित अंतरापेक्षा ही लाईटिंग अधिक उंचीवर असल्याची तपासणी करीत राहावी. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वायरमनकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.