Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करा:संजय ताकसांडे यांचे आदेश

Date:

पुणे : विविध कारणांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचार्‍यांनी पूर्णपणे सतर्क राहावे असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. दरम्यान रोहित्रांची तपासणी करून आवश्यक ठिकाणी वीजसुरक्षेसाठी ताबडतोब उपाययोजना कराव्यात व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असेही त्यांनी सांगितले.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’त सोमवारी (दि. 12) पुणे परिमंडलातील विविध कामांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे बोलत होते. पुणे परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. सुंदर लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की पावसाळ्याला सुरवात झालेली आहे. तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांची गैरसोय होते व सोबतच महावितरणचेही मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून किंवा हा पर्याय नसल्यास दुरुस्ती काम करून तातडीने सुरळीत करण्यात यावा. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर त्यासंबंधीची माहिती लगेचच संबंधीत वीजग्राहकांना एसएमएसद्वारे उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामुळे वीजग्राहकांना तक्रार करण्यापूर्वीच वीजपुरवठ्यासंबंधीची माहिती मिळेल.

पुणे परिमंडलात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त किंवा जुने इलेक्ट्रो मेकॅनिकल मीटर तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. उपविभाग कार्यालयांना बिलिंग सुधारणेसाठी सर्व अधिकार देण्यात आले आहेत. अचूक मीटर रिडींगसाठी स्थानिक उपाययोजना कराव्यात तसेच बिलींगबाबत प्राप्त झालेल्या ग्राहकांच्या तक्रारी तत्परतेने सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमध्ये महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) श्री. एकनाथ चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्ग पवार, श्री. शंकर तायडे, श्री. वाडिराज जहागिरदार, श्री. विजय भाटकर, श्री. गौतम गायकवाड आदींसह अभियंते, अधिकारी उपस्थित होते.

खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीवर नजरज्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनावश्यक किंवा दुर्लक्ष झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी केली. प्रादेशिक कार्यालयात 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून अधीक्षक अभियंता यांच्या नियंत्रणात हा कक्ष काम करणार आहे. जास्त वेळ खंडित राहिलेल्या वीजपुरवठ्यावर या कक्षाची नजर असूून त्यासंबंधीचा अहवाल ताबडतोब वरिष्ठ अधिकार्‍यांना हा कक्ष देत असतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...