Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या सौरऊर्जा वीज खरेदीला प्रति युनिट २ रुपये ७१ पैसे दर

Date:

मुंबई : महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर रुपये ७१ पैसे मिळाला आहेमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी १००० मे.वॅ. सौरऊर्जा दीर्घकालिन निविदाद्वारे खरेदी करण्यासाठी सदर निविदा प्रकियेला सुरूवात करण्यात आली होती.  

केंद्र सरकारच्या नवीन नवीकरणीय मंत्रालयाने कर शुल्क यांच्या कायद्यातील बदल करारामध्ये समाविष्ट करण्याबाबतचे स्पष्टीकरण जारी केल्यानंतर सदर निविदेची उलट बोली ही टीसीआयएलच्या संकेतस्थळावर (https://www.tcil-india-electronictender.com) दि. १४ मे २०१८ रोजी पार पाडण्यात आलीयात आठ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता आणि त्यांची एकूण क्षमता सुमारे ,४५० मे.वॅ. इतकी होती.

 त्यापैकी एक हजार मेगावॅटसाठी खालील निविदाकार पात्र ठरले. यामध्ये मे. जेएलटीएम एनर्जी (२० मे.वॅ.) मे. माहोबा सोलार प्रा.लि.,(200 मे.वॅ.) हे सर्वात कमी बोली लावलेले निविदाकार ठरले असून त्यांनी रुपये ७१ पैसे प्रतियुनिट इतक्या कमी दराची बोली लावलीमे. रिन्यु सोलार पॉवर प्रा.लि.,(२५० मे.वॅ.) मे. एक्मे सोलार होल्डिंग् लि.,(२५० मे.वॅ.) मे. टाटा पॉवर रिन्युयबल एनर्जी लि.,(१५० मे.वॅ.) आणि मे. अजुरे पॉवर (इंडिया) प्रा. लि., (१५० मे.वॅ.) यांनी रुपये ७२ पैसे प्रतियुनिट इतकी बोली लावली होती.  या प्रकियेत प्राप्त झालेला न्युनतम दर हा या वर्षात मे. एनटीपीसीने देशातील इतर राज्यांनी काढलेल्या निविदांमध्ये न्युनतम दर ठरला आहे. सौरऊर्जेमधील निविदाकारांनी महाराष्ट्र शासन महावितरणवर विश्वास दाखविला याबद्दल महावितरण व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले आहे.

या प्रकल्पांतून उपलब्ध होणाऱ्या सौरऊर्जेमुळे महावितरणला महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच अपारंपारिक ऊर्जा खरेदीच्या बंधनाची पूर्तता करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच महावितरण कंपनीने महाराष्ट्र शासनाच्यामुख्यमंत्री सौरकृषी वाहिनीयोजने अंतर्गत राज्यातील कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी कृषी प्राबल्य असलेल्या २० जिल्हयांतील सुमारे २१८ तालुक्यात मेगॅवॅट ते  १० मे.वॅ. इतक्या क्षमतेचे एकूण हजार मे.वॅ. क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढलेली असून त्याची प्रकिया चालू आहे. महावितरण कंपनीतर्फे सर्व सौरऊर्जा प्रकल्प विकासकांना आवाहन करण्यात येते की, या निविदा प्रकियेतही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...