महावितरणची ग्राहकसेवा गतीमान अन्‌ पारदर्शक-नितीन गुजराथी

Date:

पुणे : प्रादेशिक कार्यालय अस्तित्वात आल्यापासून महावितरणच्या कार्यालयीन कामकाज अधिक शिस्तप्रिय झाले आहे. ग्राहकसेवा सुद्धा आणखी गतीमान व पारदर्शक होत आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा विद्युत वितरण सनियंत्रण समितीचे सदस्य श्री. नितीन गुजराथी यांनी केले.

येथील ‘प्रकाशभवन’मध्ये महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांची श्री. गुजराथी यांनी नुकतीच भेट घेतली व विविध मुद्‌द्यांवर चर्चा केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. रवी अनासपुरे, नगरसेवक श्री. महेश लडकत, नगरसेवक श्री. योगेश समेळ, श्री. विनायक आंबेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री. गुजराथी म्हणाले, की प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे प्रशासन अधिक ग्राहकाभिमुख झालेले आहे. थकबाकी वसुली, विविध ग्राहकसेवांची गतीमान व पारदर्शकपणे अंमलबजावणी, ग्राहक संपर्क, बिलींगमधील सुधारणा, मीटर उपलब्धतता व त्याबाबत सातत्याने ग्राहकांना माहिती देणे, स्वयंघोषित एंजटांना पायबंद घालण्याचे प्रयत्न उल्लेखनीय आहे. यावेळी श्री. गुजराथी व सहकार्‍यांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांचा अभिनंदन पत्र प्रदान करून गौरव केला.

यावेळी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले की, महावितरणसाठी ग्राहक हाच सेवेचा केंद्गबिंदू आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. पुणे प्रादेशिक विभाग हा महाराष्ट्रातील इतर प्रादेशिक विभागांसाठी ग्राहकसेवा, प्रशासकीय कामकाजामध्ये एक मॉडेल राहील यादृष्टीने सुधारणा व उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी प्रादेशिक श्री. ताकसांडे यांनी दिली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले महावितरणचे मीटर रिडींग, नवीन वीजजोडणी, कर्मचारी मित्र व वीजग्राहकांसाठी असलेले विविध मोबाईल अ‍ॅप तसेच एम्प्लॅाई पोर्टल, डॅशबोर्ड आदींची माहिती यावेळी देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मध्यरात्रीनंतर महापौर मंजुषा नागपुरे नदीकाठी; नागरिकांना सावधानतेचा इशारा

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या...

खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडले, मुठा नदीत २७ हजार २०३ क्युसेक्सने विसर्ग

चारही धरणांचा पाणीसाठा १३.९७ टीएमसीवर; अवघ्या १३ तासांत १.७६...

खडकवासल्यातून मुठा नदीत पाणी सोडले..

खडकवासला धरणातून मध्यरात्री १ वाजल्यापासून मुठा नदीत १,६८४ क्युसेक...

रस्त्यांचे झाले नाले..केंद्रीय मंत्री मोहोळ अधिकाऱ्यांना म्हणाले,आजवर तुम्ही काय केले.. ?

आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा घेतला आढावा पुणे (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि...