Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापालिकेच्या खोदकामात दोन वीजवाहिन्या तुटल्या स्वारगेट, सदाशिव पेठ, बाजीराव रोड, पर्वती परिसरात अडीच तास वीज खंडित

Date:

पुणे : सिंहगड रस्त्यावर पुणे महानगरपालिकेकडून सुरु असलेल्या ड्रेनेजच्या खोदकामात गुरुवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता दोन वीजवाहिन्या तुटल्याने स्वारगेट, पर्वती, सदाशिव पेठ, सहकारनगर आदी परिसरातील सुमारे 23 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा अडीच तासांसाठी खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी, की पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यानाजवळ ड्रेनेजसाठी खोदकाम सुरु आहे. यात जेसीबीने महावितरणच्या 22 केव्हीच्या दोन इनकमर वीजवाहिन्या तोडल्याने जुन्या पर्वती उपकेंद्गाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे या उपकेंद्गातून निघणार्‍या सर्वच 11 वाहिन्यांचाही वीजपुरवठा बंद झाला. परिणामी स्वारगेट, सुभाषनगर, पर्वती गाव, मित्रमंडळ चौक, अरण्येश्वर, सहकारनगर, सदाशिव पेठ, बाजीराव रोड, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी, जनता वसाहत, वाघजई, दत्तवाडी आदी परिसरातील सुमारे 23 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी 5 वाजता खंडित झाला होता.

महावितरणच्या अभियंता व कर्मचार्‍यांनी तुटलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. तुटलेली एक वीजवाहिनी रात्री 7.30 वाजता दुरुस्त केल्यानंतर जुन्या पर्वती उपकेंद्गाच्या 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु झाला. याचवेळी पर्यायी व्यवस्थेसाठी इतर कामेही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे रात्री 7.30 सुमारास जनता वसाहत, वाघजई, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्त्याचा काही भाग वगळता उर्वरित सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर पुन्हा भारव्यवस्थापन करून व पर्यायी व्यवस्थेतून रात्री साडेआठ वाजता जनता वसाहत, वाघजई, विठ्ठलवाडी व सिंहगड रस्त्याच्या परिसरातील वीजपुरवठाही सुरु करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

https://youtube.com/shorts/zq2TKqem9-Q गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते...

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...