किरीट सोमैय्यांच्या विरोधात शिवसेना कसबा मतदार संघाच्या वतीने आंदोलन

Date:

पुणे-आयएनएस विक्रांत बचाओ निधीचा अपहार केल्याप्रकरणी ईडीचा घरगडी असे संबोधत किरीट सोमय्या यांचा आज शनीपार चौक येथे शिवसेनेने जाहीर निषेध करून निदर्शने केली.
किरीट सोमय्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्याच्या मुला सहित सामील असून तसेच आयएनएस विक्रांत बचाव नावाखाली महाराष्ट्रातील जनतेकडून जी वर्गणी गोळा करण्यात आली त्यात मोठी अफरातफर केली असताना, महाराष्ट्रातील मविआ आघाडीचे नेते आणि शिवसेना नेते, खा संजय राऊत यांच्या वर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करायचे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना नेत्यांवर कट कारस्थान करून बदनामी करण्याचा जो कुटील डाव आखला आहे असे आरोप करत हे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या वेळी नंदकुमार येवले, अरविंद दाभोळकर, राजेश मांढरे, नितीन रावळेकर, सुरेंद्र जोशी, सनी गवते, युवराज पारीख, बाळासाहेब मालुसरे, राजेन्द्र शिंदे, नागेश खडके, अमर मारटकर, राजेंद्र गिरी, रुपेश पवार, अनंत घरत, संजय जगताप, शिवाजी मेलेकरी, तुषार भोकरे, हर्षद ठकार, गिडेन बेन युवासेनेचे – शंकर साठे, अक्षर फुलसुंदर, प्रशांत पैलवान, राजन अवघडे, प्रथमेश नेटके, मुरली विलकर, सत्यजित कवडे, संदीप साळुंखे. युवती सेना सहसचिव- शर्मिला येवले, गायत्री गरुड, ईशा येवले,रिद्धी मांढरे वैभवी सूर्यवंशी, निकिता मारटकर, स्वाती कत्थलकर, राजश्री भगणे, सुलभा तळेकर, ज्योती पवार, अनुपमा मांगडे,कसबा मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...