महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे- अरविंद शिंदे

Date:

पुणे-अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना केंद्रातील भाजपचे मोदी सरकार सूडबुध्दीने लक्ष करीत असून ईडीच्या चौकशीसाठी सातत्याने बोलवित आहेत. याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथील देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या पुतळ्याजवळ शांततापूर्ण बैठा सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे ,माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,आबा बागुल,अविनाश बागवे , ॲड. अभय छाजेड, संगीता तिवारी, आदींनी आपले विचार व्यक्त केले.     तसेच यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, कमल व्यवहारे,माजी महापौर रजनी त्रिभुवन बाळासाहेब दाभेकर,नीता परदेशी , महिला अध्यक्षा पुजा आनंद, नगरसेविका लता राजगुरू, वैशाली मराठे, , अजित दरेकर, नरेंद्र व्यवहारे, अण्णा राऊत,, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, सतीश पवार, भरत सुराणा, अविनाश अडसुळ, प्रशांत सुरसे, शिलार रतनगिरी, राजू साठे, राहुल तायडे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, सिमा महाडिक, योगिता सुराणा, ॲड. निलेश बोराटे, राजू नाणेकर, उमेश कंधारे, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे, भगवान कडू, बाळासाहेब प्रताप, रवि मोहिते, कान्होजी जेधे, शिवराज भोकरे, अक्षय माने, वैशाली परदेशी, अनुसया गायकवाड, वाल्मिक जगताप, सुरेश कांबळे, सचिन सावंत, चेतन आगरवाल, शाबीर खान, नर.सिंह आंदोली, हनुमंत राऊत, विक्रम खन्ना, बाबा सय्यद, हेमंत राजभोज, ॲड. अश्विनी गवारे, श्रीकृष्ण बराटे, अविनाश गोतारणे, रवि पाटोळे,रफिक शेख आदी उपस्थित होते.  

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने घेतलेले चूकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजकीय सूडबुध्दीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांना लक्ष करून ईडीच्या चौकशीसाठी बोलविले जात आहे. हे हुकूमशाही सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करीत असून या विरूध्द आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ज्या पध्दतीने केंद्रातील मोदी सरकार आमच्या नेत्या सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना ईडी चौकशी मार्फत त्रास देत आहे व काँग्रेस पक्षाला बदनाम करीत आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असावा असे काँग्रेस पक्षाला वाटते परंतु या ठिकाणी केंद्रातील भाजप सरकार हे हिटलरशाही पध्दतीने विरोधी पक्ष संपविण्याचे काम करीत आहे.’’

सत्याग्रहाचे सूत्रसंचालन द. स. पोळेकर यांनी केले तर आभार सचिन आडेकर यांनी मानले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...