पुणे, १६ ऑगस्ट, २०१७: “द ग्रेट पुणेरी कुक-ऑफ” या अंतिम पाककृती स्पर्धेचे आयोजन अमनोरा मॉलच्या फूड कोर्ट येथे होणार असून या स्पर्धेत एका पेक्षा एक सरस असे ६० शेफ भाग घेणार असून ‘सेलिब्रिटी टेस्ट बड्स’ ही पदवी जिंकण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा होईल. या स्पर्धेचे आयोजन येत्या १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ च्या दरम्यात करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना थेट स्वयंपाकघरातील उत्कृष्ट पाककला पहावयास मिळेल. ही रोचक स्पर्धा अनुभवतानाच या स्पर्धेचे परीक्षक सेलिब्रिटी शेफ शैलेंद्र यांच्याकडून उपस्थितांस पाककृतीतील काही टिपा सुद्धा मिळणार आहेत.
पुणेकरांच्या पसंतीचे शॉपिंग डेस्टिनेशन असणाऱ्या अमनोरा मॉल येथे “द ग्रेट पुणेरी कुक-ऑफ” येथे स्पर्धकांना प्रेरित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यातआहे.