नवी दिल्ली-काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर दिल्लीतील रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता यांनी मंगोलपुरी येथील त्यांचे 4 मजली घर राहुल गांधींच्या नावे केले आहे.
राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकसभा सचिवालयाने 24 मार्च 2023 रोजी अधिसूचना जारी करून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व 23 मार्च 2023 पासून रद्द केले आहे. त्यामुळे, 17व्या लोकसभेचे खासदार म्हणून, ते आता त्यांना देण्यात आलेल्या 12 तुघलक लेनमधील सरकारी निवासस्थानात जास्तीत जास्त एक महिना म्हणजेच 22 एप्रिल 2023 पर्यंत राहू शकतात. त्यांना देण्यात आलेल्या या सरकारी घराचे वाटप 23 एप्रिल 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे राहुल गांधींना 22 एप्रिल 2023 पर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागेल हे स्पष्ट आहे