रामनवमी निमित्त केवळ महिलांचा सहभाग असलेला अखंड हरिनाम सप्ताह साजरा
पुणे : टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरात श्री रामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी फुलांची उधळण करीत श्रीराम जन्माचा सोहळा अनुभवला. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार रामजन्मानंतर सायंकाळी मंदिरातून दिंडी निघाली आणि तुळशीबागेतील राम मंदिरास भेट देऊन पुन्हा मंदिरात आल्यावर महाआरती झाली.
रामनवमी निमित्त केवळ महिलांचा सहभाग असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम झाले. वीणा घेण्याचा मान देखील सर्व महिलांना मिळाला. अरुणा बांदल, सोनाली थोरात, सुरेखा काळभोर, रुपाली गाजरे, जयश्री अंबिके यांच्या हस्ते कलशपूजन झाले. ट्रस्टचे विश्वस्त दिलीप बांदल, दिलीप काळभोर, दिपक थोरात, बाळासाहेब ताठे, नरेंद्र गाजरे, महेश अंबिके, रमेश मणियार, उपस्थित होते.
दिपक थोरात म्हणाले, संपूर्ण पुणे शहरात अखंड हरिनाम सप्ताहात केवळ महिलांचा सहभाग ही संकल्पना सर्वप्रथम श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आली. पुण्यातील विविध भागातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. ९ महिला भजनी मंडळांचा यामध्ये सहभाग होता.