मेहुल चोक्सीविरुद्ध इंटरपोलनं जारी केलेल्या रेड नोटिशीशी निगडित कारवाई सीबीआयकडून सुरू

Date:

मुंबई, 21 मार्च 2023

पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध 15 फेब्रुवारी 2018 रोजी गुन्हा दाखल झाला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(सीबीआय) ने मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 120-बी, 409, 420, 477 ए, 201 आणि 1988 च्या दंड संहिता कायद्याच्या 7 आणि 13(2), 13(1)(सी) आणि(डी) या कलमांतर्गत दोन आरोपपत्रे आधीच दाखल केली आहेत. त्यानंतर 2022 मध्ये सीबीआयने बँक आणि वित्तीय संस्थांची फसवणूक केल्याबद्दल चोक्सी आणि इतरांविरुद्ध आणखी पाच फौजदारी खटले दाखल केले.

नॅशनल सेंट्रल ब्युरो या नात्याने सीबीआयने फेब्रुवारी 2018 मध्ये चोक्सीला शोधण्यासाठी  सहकार्य करण्याबाबत विनंती केली. परदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांच्या थेट समन्वयाने त्याच्या हालचालींवर सीबीआयने नजर ठेवली. तेव्हा तो अँटिग्वा आणि बारबुडा येथे भूमिगत होता. त्यानंतर चोक्सी विरुद्ध प्रत्यार्पणाची विनंती अँटिग्वा आणि बारबुडाच्या अधिकाऱ्यांना राजनैतिक माध्यमातून ऑगस्ट, 2018 मध्ये पाठवण्यात आली होती.

2018 मध्ये चोक्सीने रेड नोटीस (आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट)जारी न करण्याची विनंती कमिशन फॉर कंट्रोल ऑफ इंटरपोल फाइल्स (सीसीएफ) कडे केली. सीसीएफ ही इंटरपोलचीच एक स्वतंत्र संस्था आहे. ही इंटरपोल सचिवालयाच्या नियंत्रणाखाली नाही. या संस्थेत मुख्यतः विविध देशांतील नियुक्त वकील कार्यरत असतात. सीसीएफने त्याच्या विनंतीचा अभ्यास करून सीबीआयचा सल्ला घेतला होता. सीसीएफने मेहुल चिनुभाई चोक्सीचा दावा फेटाळून लावला आणि परिणामी इंटरपोल ने रेड नोटीस जारी केली.

सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या विनंतीवरून इंटरपोलने डिसेंबर 2018 मध्ये आरोपी चोक्सी विरुद्ध ही रेड नोटीस जारी केली. सीबीआयने चोक्सीचा ठावठिकाणा शोधल्यानंतर त्याच्या प्रत्यर्पणाची विनंती केली. इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटिशीचा उद्देश एखाद्या वॉन्टेड व्यक्तीचा ठावठिकाणा शोधणे आणि प्रत्यर्पण, आत्मसमर्पण किंवा तत्सम कारवाईच्या उद्देशाने त्यांना ताब्यात घेणे, अटक करणे किंवा हालचालींवर प्रतिबंध करणे हा आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की इंटरपोलने रेड नोटीस जारी होण्यापूर्वीच चोक्सी कुठे आहे हे ही भारताला समजले होते आणि त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रयत्न सुरू झाले होते. रेड नोटिशीचा प्राथमिक उद्देश आधीच साध्य झाला असला तरी सावधगिरीचा उपाय म्हणून ती नोटीस कायम ठेवण्यात आली.

मेहुल चिनुभाई चोक्सी याच्या विरोधात अँटिग्वा आणि बारबुडा येथे प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू असताना, दिशाभूल करण्यासाठी मेहुल चिनुभाई चोक्सी बनावट आणि काल्पनिक कथानकांसह विविध आंतरराष्ट्रीय मंचांशी संपर्क साधत होता. 2019 मध्ये, मेहुल चिनुभाई चोक्सीने इंटरपोलच्या वेबसाइटवरून रेड नोटीस (प्रत्यार्पण आदेश) काढून टाकण्यासाठी इंटरपोल फाइल्स नियंत्रण (सीसीएफ) आयोगाशी पुन्हा संपर्क साधला होता. सीसीएफ ने त्याच्या विनंतीचा अभ्यास केला, केंद्रीय तपास संस्थेचा (सीबीआय) सल्ला घेतला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे 2020 मध्ये पुन्हा मेहुल चिनुभाई चोक्सीची याचिका फेटाळून लावली.

अँटिग्वा आणि बार्बुडा कडून लवकरच प्रत्यार्पणाचा आदेश मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन, मेहुल चिनुभाई चोक्सीने, खोटे दावे, रचलेल्या नाट्यमय कथा आणि काल्पनिक कथांसह, चालू प्रक्रियेला वेगळी दिशा देण्यासाठी, आणि प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला खंडित करण्याच्या उद्देशाने पुन्हा विविध आंतरराष्ट्रीय मंचांबरोबर संपर्क साधला, आणि सीसीएफ ने 2020 मध्ये दिलेल्या निर्णयावर फेरविचार करावा, यासाठी जुलै 2022 मध्ये सीसीएफ शी संपर्क साधला. या प्रकरणी सीसीएफ ने सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) सल्ला घेतला. मेहुल चिनूभाई चोक्सीचे कथन पूर्णपणे अप्रमाणित आणि कोणत्याही पुराव्या शिवाय असल्याची वस्तुस्थिती सीसीएफ समोर मांडली गेली. मेहुल चिनूभाई चोक्सी अँटिग्वा आणि बार्बुडा येथे सुरू असलेल्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेया खंडित करण्यासाठी, आणि भारतामधी कायदेशीर प्रक्रियेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तथापि, पाच सदस्यीय सीसीएफ चेंबरने रेड नोटीस हटविण्याचा निर्णय घेतला होता. हे नोव्हेंबर 2022 मध्ये कळवण्यात आले होते.   

त्यानंतर, कोणताही आधार नसलेल्या आणि चुकीच्या निर्णयापर्यंत पोहोचताना, सीसीएफ च्या कार्यपद्धती मधील गंभीर उणीवा, प्रक्रियांचे आणि आदेशांचे उल्लंघन आणि चुका, सीबीआय ने सीसीएफ च्या निदर्शनास आणून दिले. या सदोष निर्णयाच्या दुरुस्तीसाठी आणि रेड नोटीस पुनर्संचयित करण्यासाठी सीबीआय, इंटरपोल अंतर्गत उपलब्ध उपचारात्मक आणि अपील पर्यायांचा वापर करत आहे.  अर्जदाराने त्याच्या अँटिग्वा आणि बारबुडा इथल्या नागरिकत्वासाठी अर्ज करताना, भौतिक तथ्ये लपवली अथवा चुकीचे दाखले दिले, यावरून त्याचे यापूर्वीचे वर्तन दिसून येत आहे. त्याच्या विरोधातले आरोप सिद्ध करण्यासाठी हा पुरेसा पुरावा असल्याची गोष्ट अँटिग्वामधील अधिकारी देखील विचारात घेत असल्याचे सीबीआय ने निदर्शनास आणून दिले आहे.

CCF चा निर्णय मेहुल चिनूभाई चोक्सीवर भारतात ज्या गुन्ह्यांसाठी आरोप ठेवण्यात आले आहेत त्याबद्दल त्याच्या कोणत्याही दोषी किंवा निर्दोषतेबद्दल घेण्यात आलेला नाही, असं CCF ने CBI ला स्पष्ट केले आहे. CCF ने पुनरुच्चार केला आहे की त्यांनी तथ्यात्मक निश्चितता स्थापित केलेली नाही आणि मेहुल चिनुभाई चोक्सीची निष्पक्ष चाचणी होणार नाही या त्यांच्या निर्णयामध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाही. नवीन माहिती आणि निर्णयातील गंभीर त्रुटींच्या आधारे सीबीआय CCF च्या निर्णयात सुधारणा करण्यासाठी पावले उचलत आहे.

सीबीआय या प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या प्रक्रियेत CCF आणि इंटरपोलमधील इतर संस्थांबरोबर क्रियाशील संवाद साधत आहे.

प्रत्यार्पणासाठी इंटरपोल रेड नोटीस पूर्वापेक्षित किंवा आवश्यकता नाही, हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं. सीबीआयचं जागतिक प्रचलन केंद्र विदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांशी थेट समन्वय साधून मेहुल चिनुभाई चोक्सीसारख्या व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि ते केवळ इंटरपोलच्या माध्यमांवर अवलंबून नाही. भारताने प्रत्यार्पणाची केलेली विनंती अँटिग्वा आणि बार्बुडामधील अधिकाऱ्यांसमोर सक्रिय विचाराधीन आहे आणि इंटरपोल बरोबर रेड नोटिस संबंधित संवादामुळे पूर्णपणे प्रभावित नाही.

सीबीआय फरारी आणि गुन्हेगारांना भारतात परत आणून त्यांना फौजदारी न्याय प्रक्रियेला सामोरं करण्यासाठी वचनबद्ध आहे. परकीय कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांबरोबर जवळीक साधून हव्या असलेल्या फरारी आणि आर्थिक गुन्हेगारांचे भौगोलिक स्थान शोधून त्यांना परत भारतात आणण्यासाठी पद्धतशीर पावलं उचलण्यात आली आहेत. गेल्या 15 महिन्यांत 30 हून अधिक हवे असलेले गुन्हेगार भारतात परत आणले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...