मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत

Date:

आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

पुणे : नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) पुढे सरसावला आहे. बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांच्याकडून मदतीचा धनादेश स्वीकारला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारण आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बीव्हीजीने एक कोटी रुपयांचे योगदान दिले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि संकटांमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक व आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, तसेच कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. सीएसआर निधी, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून मदतीचा हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.

बीव्हीजी समूह स्वच्छता, औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, शेती विकास, सेंद्रिय शेती, महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. महाराष्ट्रात समूहाकडून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिका सेवेचे संचालनही केले जाते. गेल्या १२ वर्षांपासून ही सेवा राज्यात अविरतपणे कार्यरत आहे.

सामाजिक बांधिलकी जपत बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या वतीने सीएसआरअंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांना आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा समूहाचा प्रयत्न आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी द्यावी; विद्यार्थी प्रतिनिधींची मागणी

सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे PSI विद्यार्थ्यांचे निवेदन; मुख्यमंत्री...

पुणे गुन्हेगारांचे आणि बिल्डरांचे शहर बनत चाललेय; रवींद्र धंगेकरांचा पोलिसांवर गंभीर आरोप!

जमीन व्यवहारांत काही पोलीस अधिकारी, गुन्हेगार आणि बिल्डर लॉबीचे...

शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ला प्रकरण : पाच आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी;सहावा आरोपी अल्पवयीन

अर्ध्या गुंठा जमिनीच्या वादातून सुरू झालेल्या वैमनस्याची पार्श्वभूमी; मंदार...

दुष्काळग्रस्तांसाठी श्रीनाथ भिमाले यांच्याकडून २५ लाखांची मदत

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला...