कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या जवानांसोबत भाऊबीज साजरी

Date:

खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात सैनिकांसोबत भाऊबीज : सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजन

पुणे : देशसेवा बजावताना गंभीर दुखापतीमुळे अपंगत्व आलेल्या जवानांना दिवाळीच्या सणात कुटुंबाची उणीव भासू नये, या भावनेतून खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात (पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर) भाऊबीज साजरी करण्यात आली. भारत माता की जय… च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. 

सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा पुणेकर, लेखिका सुनेत्रा मंकणी आणि राष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर, केंद्राचे कर्नल आर. के. मुखर्जी, कर्नल बी.एल. भार्गव आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जवानांचे औक्षण करण्यात आले. कपाळावर टिळा लावून आणि दिवाळीचा फराळ देऊन जवानांप्रती स्नेह व्यक्त करण्यात आला. 

सिमरन गुजराथी, तृप्ती पाटील, ललिता जळगावकर, कल्याणी सराफ, श्रेया फाटक, आरती नाईक, सुप्रिया तांबट आदिंनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी संपूर्ण समाज  उभा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

औक्षणानंतर जवानांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आली. जवानांनीही या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला.

आयोजक आनंद सराफ म्हणाले, देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे आणि जवानांना कुटुंबाची उणीव जाणवू नये आणि त्यांच्याप्रती समाजातील आदर व्यक्त व्हावा, या उद्देशाने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या जागेचा पाठपुरावा…

📍नवी दिल्ली पुणे शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी खडकवासला येथे...

एफसी रस्त्यावरील अतिक्रमणांना कायमचा आळा घालणार; सभागृहनेते गणेश बिडकर मैदानात!

मुख्यसभेतील गदारोळ आणि अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर बिडकरांची प्रत्यक्ष पाहणी; ‘एक...

पुणे महापालिकेच्या शाळांचा होणार कायापालट; ३४ कोटी ६४ लाखांच्या विकासकामांना मंजुरी!

चार परिमंडळांतील शाळा बनणार आदर्श; पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी स्थायी...