पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री!

Date:

पुनित बालन आणि प्रणव बाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’चा तिसऱ्या हंगामात सहभाग

डुकाटीच्या डेस्मो ४५० एमएक्स आणि डेस्मो २५० एमएक्स बाईक्सचा ट्रॅकवर थरार

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय सुपरक्रॉस रेसिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मकता वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यातील ‘पुनित बालन ग्रुप’ने (पीबीजी) जागतिक स्तरावरील मोटरस्पोर्ट ब्रँड डुकाटीशी हातमिळवणी केली असून भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) तिसऱ्या हंगामासाठी ‘पीबीजी डुकाटी रेसिंग’ या नव्या संघाची घोषणा करण्यात आली. उद्योजक पुनित बालन आणि मोटरस्पोर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ प्रणव बाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ स्पर्धेत उतरणार आहे. या भागीदारीमुळे भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान, स्पर्धात्मकता आणि नव्या खेळाडूंना संधीचे एक नवे दालन खुले झाले आहे.

या नव्या संघासाठी डुकाटी प्रमुख प्रायोजक म्हणून सहभागी झाली आहे, तर प्रणव बाकरे हे सहमालक असतील. पीबीजीचा विविध क्रीडा प्रकारांमधील गुंतवणूक आणि संघ उभारणीचा अनुभव, बाकरे यांचे सुपरबाईक आणि मोटरस्पोर्ट क्षेत्रातील कौशल्य तसेच डुकाटीचा जागतिक रेसिंगमधील लौकिक या तिन्ही गोष्टींचा संगम या माध्यमातून साधण्यात आला आहे. डुकाटीने भारतीय सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेत कालिकत येथे आपली ‘डेस्मो ४५० एमएक्स’ ही ऑफ-रोड बाईक सादर केली होती. आता ही बाईक केवळ प्रदर्शनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्पर्धेसाठी उतरणार आहे. यासोबतच नव्याने सादर करण्यात आलेली ‘डेस्मो २५० एमएक्स’ ही बाईकही तिसऱ्या हंगामात स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या बाईक्सना अन्य संघांच्या बाईक्सशी थेट स्पर्धा करण्याची संधी मिळेल.

पीबीजी डुकाटी रेसिंगच्या माध्यमातून स्पर्धात्मक संघ उभारण्यासोबतच देशातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. सुपरक्रॉस या मोटरस्पोर्ट प्रकाराची ओळख प्रस्थापितांपलीकडे नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्टही या भागीदारीतून ठेवण्यात आले आहे. डुकाटीचा मोटोजीपी आणि वर्ल्ड सुपरबाईक स्पर्धांमधील अनुभव, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण इंजिनिअरिंग आणि जागतिक स्तरावरील रेसिंग परंपरा यामुळे भारतीय सुपरक्रॉस स्पर्धेला नवी ओळख मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहन उत्पादक कंपन्या थेट संघांमध्ये गुंतवणूक करीत असल्याने स्पर्धेतील तांत्रिक गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढण्यासही यामुळे मदत होणार आहे.

यासंदर्भात डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले, “आयएसआरएलच्या दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेत कालिकत येथे आम्ही भारतात डुकाटीचा ऑफ-रोड कार्यक्रम सादर केला होता. त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डुकाटीच्या शंभराव्या वर्धापनदिनाच्या वर्षात भारतीय स्पर्धात्मक रेसिंग क्षेत्रात आपली क्षमता दाखविण्यासाठी आयएसआरएल हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. प्रमुख संघ प्रायोजक म्हणून या भागीदारीसाठी डुकाटी इंडिया पूर्णपणे कटिबद्ध आहे. देशभरातील नव्या पिढीतील रायडर्सना प्रेरणा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

पुण्यातील डुकाटी डीलरशिप ‘लेगसी मोटर्स’चे मालक आणि इंडियन सुपरबाईक लीगचे सहसंस्थापक प्रणव बाकरे यांना मोटरसायकल व्यवसायासोबतच रेसिंग क्षेत्राचा अनुभव आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘‘शर्यतीचा निकाल हा केवळ प्रारंभरेषेवर ठरत नाही तर त्यासाठी आधीपासून केलेली तयारी, दर्जेदार वाहने आणि रायडर्सच्या पाठीशी असलेली सक्षम टीम महत्त्वाची असते. पुनित बालन यांचा संघ उभारणीचा अनुभव आणि क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याची भूमिका यामुळे संघाला बळ मिळेल. डुकाटीचा जागतिक मोटरस्पोर्ट वारसा आणि अभियांत्रिकी कौशल्य यांचा लाभ घेत पहिल्या फेरीपासूनच विजयासाठी सज्ज संघ उभारण्याचे आमचे ध्येय आहे.’’

याबाबत आयएसआरएलचे सहसंस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “दुसऱ्या हंगामाच्या अंतिम स्पर्धेत डुकाटीने भारतातील आपला ऑफ-रोड कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर वर्षभरातच कंपनीने स्पर्धेतील एका संघाला पाठबळ दिले आहे. क्रीडा आणि उद्योग क्षेत्राचा संगम घडविणारे आयएसआरएल हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. दोन मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांनंतर डुकाटी ही स्पर्धेतील संघाला पाठबळ देणारी तिसरी मोठी वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाईक्सवर स्पर्धा करण्याची संधी भारतीय तरुण रायडर्सना मिळतेय, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.”

“भारतीय रेसिंगमधील उत्साह, कामगिरी आणि क्रीडाभावना प्रतिबिंबित करणारा संघ उभारण्याच्या उद्देशाने आम्ही आयएसआरएलमध्ये सहभागी झालो आहोत. प्रणव बाकरे यांनी सहमालक म्हणून सहभाग घेतल्याने आणि डुकाटीची साथ मिळाल्याने आम्ही ठेवलेल्या उद्दिष्टाला निश्चितच मोठं बळ मिळणार आहे. स्पर्धात्मक संघ उभारणं, तरुण क्रीडापटूंना पाठबळ देणं आणि चाहत्यांना अभिमान वाटेल अशी संघाची ओळख निर्माण करणं, यावर आमचा भर असेल आणि यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ.”

  • पुनीत बालन
    अध्यक्ष, पुनित बालन ग्रुप व सहमालक पीबीजी डुकाटी रेसिंग
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले? ते आधी सांगा व नंतर लाखो वृक्ष लागवडीचे बोला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या गुरुवारी २९ ॲाक्टोबरला भिमाशंकर...

विधान परिषद निवडणूक : पुण्यात हर्षदा देशमुख-जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा जल्लोष

पुणे : राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणूक निकालाचे...

पीएमआरडीए’ची ‘झोन’, ‘पार्ट प्लॅन’ अन् ‘साईट एलिव्हेशन’ प्रमाणपत्रे आता स्वयंचलित पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध!

प्रशासकीय सुधारणांचे नवे पर्व! ‘पीएमआरडीए’चे जीआयएस पोर्टल संपूर्ण राज्यासाठी...