हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतांचा भाव फुटला!

Date:

अधिकृत पॅनेल पेक्षा बंडखोरीला वरिष्ठांचीच फूस! राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये चुरस; भाजपच्या गोटात शांतता

पुणे (PRAB)- हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक तब्बल दोन तपानंतर होत आहे. त्यामुळे यानिवडणुकीत संचालक पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून प्रारूप यादीनुसार संबंधित मतदारांच्या इच्छुकांच्या भेटीगाठींमुळे मतांचा भाव वधारला असून किमान 50 हजार इतका मतांचा भाव  फुटला आहे.       दरम्यान पुणे जिल्ह्यातील कृषी सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने मोठ्याप्रमाणावर जुनी-जाणती जेष्ठ पदाधिकारी व युवा कार्यकर्ते संचालक पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अधिक चुरस असलेल्या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीच्या नावे अ वर्ग मतदारांची चांदी होऊन ‘जो जिता वही सिकंदर’ प्रमाणे ‘निवडून येईल तो पक्षाचा उमेदवार’ असा पवित्रा पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला त्याच प्रमाणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूकीत देखील घेतला जाणार आहे हे गृहीत धरूनच इच्छुकांकडून प्रचाराची धामधूम सूरु असल्याने मतांचा भाव देखील फुटला आहे. अधिकृत पॅनेल पेक्षा बंडखोरीला वरिष्ठांचीच फूस असल्याची इच्छुकांकडून मतदारांमध्ये बिंबवले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी भाजपच्या गोटात मात्र शांतता दिसून येत आहे. भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे देखील अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.       हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने आर्थिक लाभाचे प्रमाणही मोठ्याप्रमाणावर असल्याने या-ना-त्या कारणाने तब्बल 18 वर्ष निवडणूक टाळण्यात प्रशासकीय बाबू यशस्वी झाले होते. निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, न्यायालयामध्ये वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक बोर्ड बरखास्त करण्यात आले. ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची का? पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक विद्वान लोक यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते अजूनही आहेत. शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीची निवडणूक ही २९ एप्रिल २०२३ रोजी घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक पार पडत आहे.      दोन तपानंतर होत असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून जाण्यात अनेक राजकीय पदाधिकारी इच्छुक आहेत. राजकारणातील ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्या बाजार समितीची निवडणुकीसाठी थांबलेले आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांकडून पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता प्रचारात सक्रियता दर्शवली आहे. संपूर्ण जिल्ह्याची मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणीच होत असते. यामुळे सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.      आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती साठी १८ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी सोसायटी मधून ११ जागांसाठी एक हजार ६५५ मतदार, ग्रामपंचायतमधून चार जागांसाठी ७१३ मतदार, व्यापारीमधून दोन जागांसाठी १३ हजार १७० मतदार तर कामगार हमाल मापाडीमधून एका जागेसाठी एक हजार ७८० मतदार असणार आहेत.      १५ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या बैठका होत आहेत मात्र भाजपकडून सक्रीय हालचाली दिसून येत नाहीत. अनेक वर्षांनी होणाऱ्या सहकारातील प्रतिष्ठित असणारी ही निवडणूक हवेली तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लावणारी असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून यात १८ जागांसाठी १७ हजार ४१९ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.       महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांच्यामधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचे सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो. बाजार समितीच्या सध्याच्या निवडणूक पद्धतीत कार्यक्षेत्रातील सेवा संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्यांकडून ११ व ग्रामपंचायत सदस्यांकडून ४ असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडले जातात. शिवाय व्यापारी २ व हमाल, मापाडी १ असे एकूण १८ प्रतिनिधी निवडून दिले जातात. सोसायटी मतदारसंघातील ११ जागांमध्ये सर्वसाधारण ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १ तर भटक्या जातीजमाती १ अशी विभागणी असते.    या निवडणुकीत विविध गटातील १८ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १८ पैकी ११ उमेदवार हवेली तालुक्‍यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून निवडले जाणार आहेत. यासाठी १३४ सोसायटीचे १ हजार ६५५ सदस्य मतदान करणार आहेत. ४ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. हवेली तालुक्‍यातील ७१ ग्रामपंचायतीचे ७१३ सदस्य मतदान करणार आहेत. २ व्यापारी प्रतिनिधी आणि १ हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे. व्यापार प्रतिनिधींसाठी १३ हजार १७३ जण मतदान करणार आहेत. हमाल, तोलणार प्रतिनिधीसाठी १ हजार ५४९ हमाल आणि ३२९ तोलणार मतदान करणार आहेत.

बाजार समिती निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर-: २७ मार्च, 
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत-: २७ मार्च ते ३ एप्रिल, 
उमेदवारी अर्जांची छाननी-: ५ एप्रिल, 
वैध उमेदवारी अर्जांची यादी-: ६ एप्रिल, 
अर्ज माघारीची मुदत-: ६ ते २० एप्रिल, 
अंतिम यादी आणि चिन्हवाटप-: २१ एप्रिल, 
मतदान-: २९ एप्रिल
मतमोजणी व निकाल-: ३० एप्रिल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...