नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजन ; रक्तदान शिबीराचेही आयोजन

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग व हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. १६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे होणार आहे, अशी माहिती ट्रस्टतर्फे देण्यात  आली.

शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांसह मंदिराचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

शिबिरात नाडी, रक्तदाब, श्वसन दर, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करा तपासण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सीबीसी, थायरॉईड कार्यक्षमता, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी१२ या रक्ततपासण्यांची सुविधाही उपलब्ध असेल.

तसेच महिलांसाठी दि. १८ ऑक्टोबर रोजी मॅमोग्राफी, तर दि. १७ व १८ ऑक्टोबर रोजी हाडांच्या घनतेची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच दि. १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. नोंदणी व अधिक माहितीसाठी ७५१७५६९९२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर निवासस्थानी नवरात्री निमीत्त रंगला भोंडला आणि कन्यापूजन

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संवेदनशीलतेचा उपक्रम;...

जलसंपदा विभागच्या प्रस्तावाला मान्यता नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी...

३२ व्या पणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांना जन्मशताब्दी मानवंदना

पुणे – मराठी भावसंगीताचे विश्व आपल्या अजरामर संगीतरचनांनी समृद्ध...

हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे-मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिनपुणे : आजची परिस्थिती...