देवीस्वरूप असलेल्या १०८ मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजन ; विविध शाळेतील मुलींचा सहभाग
पुणे : ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः…’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात बाल शिशु मंदिर आणि समर्थ विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील १०८ मुलींच्या ‘कन्यापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कन्या पूजन हा नवरात्री पूजेचा एक अविभाज्य भाग आहे. ज्यामध्ये लहान मुलींना देवी दुर्गाच्या नऊही रूपांचे प्रतीक मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. यावेळी अभिनेत्री पूजा पवार, अपूर्वा सपकाळ, मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन देखील करण्यात आले, तसेच ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरूप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळा होता.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान श्री महालक्ष्मी मंदिरात आहे. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या मातांची रूपे वेगवेगळी आहेत आणि लहान मुलींमध्येच ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. मात्र, मुलींनी केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. त्यांनी खूप शिकून मोठे व्हायला हवे, तरच खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलसंपदा विभागच्या प्रस्तावाला मान्यता नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना २० टक्के कपातीच्या सूचना

३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी...

३२ व्या पणे नवरात्रौ महोत्सवात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यांना जन्मशताब्दी मानवंदना

पुणे – मराठी भावसंगीताचे विश्व आपल्या अजरामर संगीतरचनांनी समृद्ध...

हिंदू समाजात एकजूट निर्माण झाली पाहिजे-मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीतर्फे राष्ट्रीय एकात्मता दिनपुणे : आजची परिस्थिती...

विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- दीपा मुधोळ-मुंडे

पुणे, दि. १५ : समाजकल्याण विभागाच्या स्थापना दिनानिमित्त सहायक...