पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करा!

Date:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व लोकप्रतिनिधींना सूचना

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वांनी झोकून देऊन काम करावे. प्रत्येकाने मतदारांना केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव
आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदावार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातील सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ , पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे, पुणे पदवीधरच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे, निवडणूक प्रभारी डॉ. प्रशेम कोल्हे, प्रदेश सचिव शरद लाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रताप ऊर्फ भय्या माने यांच्यासह भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुणे पदवीधर मतदारसंघातून यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी नेतृत्व केले आहे. गेल्या वेळची निवडणूक आपल्याला गमवावी लागली. पण यंदा त्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची संधी आहे.

पुण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. माननीय मोदीजींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षकची निवडणूक प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी मतदारांना संपर्क साधून, त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच आमदारांचा आढावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पदवीधर आणि शिक्षकसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना ही त्यांनी यावेळी सर्व आमदारांना केल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

दुष्काळी उपाययोजनांचे जिल्हानिहाय प्रस्ताव १५ दिवसांत मागविण्याचे निर्देश दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ...

प्रत्येक उत्सवाला लोकरंजना बरोबरच सामाजिक उपक्रमांची जोड – संदीप खर्डेकर.

पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे "कोथरूड...