अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करता मग शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी करण्यास काय होते?: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद.

Date:

दुष्काळाने होरपळेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त ५ हजार रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा, हेक्टरी १ लाख रुपये द्या: हर्षवर्धन सपकाळ

सरकारी तिजोरी मुठभर उद्योगपतांसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी उघडा: बाळासाहेब थोरात

छत्रपती संभाजी नगरमध्ये काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा, शेतकऱ्यांचा मोर्चाला प्रचंड पाठिंबा.

मुंबई, दि. १४ ऑक्टोबर २६.

महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी दुष्काळाच्या हालअपेष्टा सहन करत आहे. हे संकट खूप मोठे आहे पण शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या वेदनेचा आवाज भाजपा महायुती सरकारच्या कानावर पडत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत पण सरकार त्यांच्यासाठी काहीही करत नाही. अदानी-अंबानीचे २० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते पण शेतकऱ्यांचे २ लाख रुपये कर्जमाफ करण्यास सरकारला काय होते? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी विचारला आहे..

छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार डॉ.शिवाजीराव काळगे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, ओसीबीचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह मराठवाड्यीतील सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोर्चाला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत असताना सुलतानी संकटाशीही त्याला दोन हात करावे लागत आहेत. यावर्षी खरिप पुर्णपणे वाया गेला, पेरलेले हाती लागणार नाही, आता बघायचे कोणाकडे. मायबाप सरकार भरीव मदत करेल ही अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. पण मुंबई व दिल्लीत आंधळं, मुकं व बहिरं सरकार बसलेले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असून दुष्काळात होरपळत असलेल्या बळीराजाची क्रर थट्टा आहे, असे सपकाळ म्हणाले..

ते पुढे म्हणाले की, निवडणुकीत वाटण्यासाठी आमदार-खासदार खरेदी करण्यासाठी भाजपा महायुतीकडे प्रचंड पैसा आहे, उद्योगपतींसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे, लबाड लांडगं ढोंग करतंय कर्जमाफी केल्याचं सोंग करतंय, अशी आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे, राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख रुपये अनुदान सरसकट दिले पाहिजे. कोणतेही सर्वे, पंचनामे, अभ्यास न करता मदत करा. सरसकट कर्जमाफी करा. शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्या, मनरेगाची कामे सुरु करा, शेतकऱ्यांच्या मुलांची सर्व शैक्षणिक फी माफ करा, एसटी पास मोफत द्या, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करा व सावकारांचा जाच थांबवा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ज्येष्ठ नेते व CWC सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, खरिप हंगाम वाया गेला आहे, रब्बी हंगामातून हाती काही लागेल असे वाटत नाही. मराठवाड्यातील स्थिती तर अत्यंत वाईट आहे. शेतकऱ्यांबरोबर शेतमजूरही संकटात आहे. चारा-पाण्याची परिस्थिती कठीण आहे. पिण्याचे पाणी नाही. सरकार शेतकरी, शेतमजूर व पशुधनाचा विचार करत नाही. दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्याचा निर्णय म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असा आहे. भाजपा महायुती सत्तेत मश्गुल आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे. फक्त घोषणाबाजी सुरु असून कृती मात्र शून्य आहे, पण हे चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे. जिराईत शेतीला हेक्टरी किती मदत देणार, बागायतीला किती मदत देणार हे सांगा. मुंबईत एअर कंडिशनमधून सरकारला दुष्काळाची दाहकता कळणार नाही. बँका, फायनान्स कंपन्या व सावकाराच्या वसुलीचा तगादा बंद करा. सरकारी तिजोरी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे ती मुठभर उद्योगपतींसाठी नाही. सरकारी तिजोरी शेतकऱ्यांसाठी उघडा असे थोरात म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बळीराजाला दिवाळीपूर्वी ५ हजाराची भेट ; राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!

दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा; ४० नवीन...

रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

जिल्हास्तरीय भरारी पथक व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची कारवाई; दोन...