भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

Date:

पुणे, दि. ५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पात्र उमेदवारांना नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकारी पदाची संधी मिळविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत यांनी केले आहे.

हा प्रशिक्षण अभ्यासक्रम १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे उपस्थित रहावे.

पुणे मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरील प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टाची प्रत घेऊन ती पूर्ण भरून दोन प्रती सोबत आणाव्यात.

या प्रशिक्षणासाठी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच एनसीसी विशेष प्रवेशासाठी एसएसबी मुलाखतीचे बोलावणे पत्र, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे बोलावणे पत्र असलेले उमेदवार तसेच विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबीचे बोलावणे पत्र किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“त्यासाठी कुणाचे पाय धरायला लागले तरी मी तयार आहे”; राज ठाकरेंनी MPSC आंदोलकांना दिला शब्द

पुणे:पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनियमित कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणांविरोधात...

लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन लातूर,...

दुष्काळामुळे मराठवाड्यातून पुण्यात मोठे स्थलांतर होण्याची शक्यता

साखर कारखाने केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांवर...