ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती

Date:

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय

पुणे- ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ हे स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठ असून; ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला होता. परिणामी या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.डिसेंबर २०२४ मध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी बी. थिलागावती यांची अध्यक्षपदी झालेली निवड कायदेशीरदृष्ट्या वादात सापडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाच्या निर्णयानुसार, या प्रकरणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप केला. विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणात विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला.

नियुक्त प्रशासक मंडळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके आणि सीओईपीचे अधिष्ठाता पराग सदगीर यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर, मंडळाने तात्काळ विद्यापीठाची सूत्रे हाती घेतली. तसेच, विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांची आंदोलनस्थळी घेऊन संवाद साधत, त्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेतले. या सकारात्मक पावलामुळे येत्या विद्यापीठाचे दैनंदिन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास निर्माण झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...