निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत?

Date:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींची चिंता सोडून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची चिंता करावी

मुंबई, दि. २७ सप्टेंबर २०२६ :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू काही आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी केला.

राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी स्वरूपात उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे मतचोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यामुळेच फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतला आहे.

मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात. राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करणे हाच सरकारचा जणू एकमेव कार्यक्रम झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याची उत्तरे आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे आहे.

राहुल गांधींच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त झालेली पिके आणि त्यांच्या कुटुंबांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हे सांगावे. हे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रानातील रखरखीतपणा बघताना सुचलेले शब्द म्हणजे कविता : कल्पना दुधाळ

पुणे : मी शेती करत असल्याने माझी सगळी स्वप्ने...

दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी तरुणाला थोबाडीत मारल्याचा व्हिडिओ व्हायरल

AAPचा आरोप – रस्त्याच्या दर्जा आणि कथित भ्रष्टाचाराबाबत प्रश्न...

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार दोन दिवसांत ठरणार,महायुतीत दोन्ही जागांसाठी रस्सीखेच

पुणे-महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या...