पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक अखेर ३३ तास २७ मिनिटांनी संपली

Date:

“आता मिरवणूक संपवा”; खासदार मेधा कुलकर्णींचे मंडळांना आवाहन-पुण्यात विसर्जन मिरवणूक दीर्घकाळ सुरू राहिल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी गणेश मंडळांना मिरवणूक लवकर पूर्ण करण्याचे आवाहन ND TV वरून केले. उत्सवाचा आनंद आणि परंपरा जपत असतानाच नागरिकांची गैरसोय, वाहतुकीवरील परिणाम आणि दीर्घकाळ सुरू असलेला आवाज याचाही विचार करावा, असा त्यांचा सूर होता. मंडळांनी विनाकारण एका ठिकाणी जास्त वेळ थांबू नये आणि मिरवणूक पुढे सरकवावी,मिरवणूक एवढी लांबविणे याला धार्मिकता म्हणता येणार नाही असे त्यांनी सांगितले.

२५ सप्टेंबरला सकाळी ८.४३ वाजता कसबा गणपतीपासून सुरुवात; २६ सप्टेंबरला सायंकाळी ६.१० वाजता मिरवणूक शांततेत पार पडल्याची पुणे पोलिसांची अधिकृत माहिती

पुणे : पुणे शहरातील यंदाची सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ३३ तास २७ मिनिटांनंतर अखेर संपली. मानाचा पहिला कसबा गणपती २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४३ वाजता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाल्यानंतर सुरू झालेला हा विसर्जन सोहळा २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता शांततेत पूर्ण झाला, अशी अधिकृत माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.पुण्याच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ आणि जिलब्या मारुती मंडळ यांच्या मिरवणुकांच्या सुरुवात आणि विसर्जनाच्या वेळांची स्वतंत्र नोंद पोलिसांनी केली आहे.

मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन

मानाचा पहिला कसबा गणपती २५ सप्टेंबरला सकाळी ८.४३ वाजता मिरवणुकीला निघाला. तो लक्ष्मी रोडमार्गे पुढे जात सायंकाळी ४.४३ वाजता नटेश्वर घाटावर विसर्जित झाला. या मिरवणुकीचा एकूण कालावधी आठ तास होता.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी ९.१८ वाजता मार्गस्थ झाला आणि सायंकाळी ५.०२ वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले. त्याची मिरवणूक ७ तास ४४ मिनिटे चालली.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती सकाळी ९.३९ वाजता निघाला आणि सायंकाळी ५.०५ वाजता नटेश्वर घाटावर विसर्जित झाला. त्याची मिरवणूक ७ तास २६ मिनिटे सुरू होती.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीसाठी निघाला. सायंकाळी ५.४० वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. मिरवणुकीचा एकूण कालावधी ८ तास १० मिनिटे होता.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती सकाळी ९.२६ वाजता मार्गस्थ झाला आणि सायंकाळी ६.१२ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जित झाला. त्याची मिरवणूक ८ तास ४६ मिनिटे चालली.

दगडूशेठचे रात्री ८.२७ वाजता विसर्जन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१८ वाजता सुरू झाली. लक्ष्मी रोडमार्गे पुढे गेलेल्या गणपतीचे रात्री ८.२७ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. त्याची मिरवणूक ४ तास ९ मिनिटे चालली.

हुतात्मा बाबू गेनू मंडळाची मिरवणूक सायंकाळी ५.४३ वाजता सुरू झाली आणि २६ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे १.०५ वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले. एकूण कालावधी ७ तास २२ मिनिटे नोंदवण्यात आला आहे.

भाऊसाहेब रंगारी गणपतीचे पहाटे विसर्जन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू झाली. रात्री ९.३१ वाजता बेलबाग चौकात आगमन झाले, तर मध्यरात्रीनंतर २.५० वाजता अलका चौकात आगमन झाले. पुढे पहाटे ४.०८ वाजता विसर्जन प्रक्रिया पूर्ण झाल्याची नोंद पोलिसांच्या अहवालात आहे. या मिरवणुकीचा कालावधी ११ तास ८ मिनिटे होता.

अखिल मंडई मंडळाची मिरवणूक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०५ वाजता सुरू झाली आणि २६ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३४ वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. एकूण ९ तास २९ मिनिटांचा कालावधी नोंदवण्यात आला.

जिलब्या मारुती मंडळाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे १.१० वाजता नटेश्वर घाटावर विसर्जन झाले. त्यासाठी ७ तास १० मिनिटे लागली.

६ लाख २८ हजारांहून अधिक गणपतींची नोंद

पोलिसांच्या आकडेवारीनुसार विसर्जन कालावधीत पुणे शहरात ४,१७० सार्वजनिक गणपती आणि ६,२४,६८५ घरगुती गणपती अशा एकूण ६,२८,८५५ गणेशमूर्तींची नोंद करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच २,९२७ सार्वजनिक आणि २,४१,५४८ घरगुती गणपतींची नोंद करण्यात आली.

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई; ११ आरोपी अटकेत

गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तादरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी एका गुन्ह्यात मोठी कारवाई केल्याचेही प्रेसनोटमध्ये नमूद केले आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२), ३१०(४), ३०९(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३० लाख ५७ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हि माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .

क्र.गणपती मंडळमिरवणूक सुरूविसर्जन / मिरवणूक समाप्तएकूण कालावधी
1कसबा गणपती – मानाचा पहिला25 सप्टेंबर, सकाळी 8:4325 सप्टेंबर, सायं. 4:438 तास
2तांबडी जोगेश्वरी – मानाचा दुसरासकाळी 9:18सायं. 5:027 तास 44 मि.
3गुरुजी तालीम – मानाचा तिसरासकाळी 9:39सायं. 5:057 तास 26 मि.
4तुळशीबाग गणपती – मानाचा चौथासकाळी 9:30सायं. 5:408 तास 10 मि.
5केसरीवाडा गणपती – मानाचा पाचवासकाळी 9:26सायं. 6:128 तास 46 मि.
6श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसायं. 4:18रात्री 8:274 तास 9 मि.
7हुतात्मा बाबू गेनू मंडळसायं. 5:4326 सप्टेंबर, पहाटे 1:057 तास 22 मि.
8श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसायं. 5:0026 सप्टेंबर, पहाटे 4:0811 तास 8 मि.
9अखिल मंडई मंडळसायं. 7:0526 सप्टेंबर, पहाटे 4:349 तास 29 मि.
10जिलब्या मारुती मंडळसायं. 6:0026 सप्टेंबर, पहाटे 1:107 तास 10 मि.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बद्रीनाथला नृत्यगृह बनवू नका’; डीजे-संगीत कार्यक्रमावर मुरली मनोहर जोशींचा तीव्र आक्षेप

‘देवभूमीचे पावित्र्य आणि सांस्कृतिक मर्यादा जपाव्यात’; केंद्र व उत्तराखंड...

SIR मधून नाव वगळले तरी पुन्हा संधी; अर्जानंतर अधिकारी घरी येऊन कागदपत्रे घेणार

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-6चा पर्याय; देशभरातील मसुदा...

भुसावळच्या आगीच्या दुर्घटनेत ‘१०८’ची मदत ठरली मोलाची

केमिकल फॅक्टरीतील धोकादायक परिस्थितीत चालक मनोज भोईटे आणि डॉ....

सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेने दिले जीवदान

सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेमुळे जीवदान रुग्णवाहिकेतच उपचार...