कोणार्क सूर्य मंदिर रथातून निघाली मंडई गणपतीची विसर्जन मिरवणूक

Date:

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. यंदा कोणार्क सूर्य मंदिर रथातून मंडई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे ३२ फूट उंचीचा भव्य रथ आणि त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० सुमारास  पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य रचनेमुळे मिरवणुकीदरम्यान रथ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.

बेलबाग चौकात ९.५५ मिनिटांनी पहिला सनई चौघडे रथ दाखल झाला. त्यानंतर १०.३६ मिनिटांनी मुख्य रथाचे बेलबाग चौकात आगमन झाले, त्यानंतर टिळक चौकात ४ वाजता मंडई गणपतीचे आगमन झाले आणि ४.३० च्या सुमारास पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.

मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे सनई-चौघडा वादन, त्यामागे न्यू गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणेशभक्तांच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भुसावळच्या आगीच्या दुर्घटनेत ‘१०८’ची मदत ठरली मोलाची

केमिकल फॅक्टरीतील धोकादायक परिस्थितीत चालक मनोज भोईटे आणि डॉ....

सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेने दिले जीवदान

सर्पदंश झालेल्या ६० वर्षीय महिलेला ‘१०८’ रुग्णवाहिकेमुळे जीवदान रुग्णवाहिकेतच उपचार...

वैभवशाली मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भावपूर्ण निरोप

कोल्ड फायरची विद्युत रोषणाई अन पुष्पवृष्टीने मिरवणूक ठरली लक्षवेधक पुणे...